Friday, May 3, 2024
Homeक्रीडाआदिवासी विकास आयुक्तालयातर्फे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा

आदिवासी विकास आयुक्तालयातर्फे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

आदिवासी विकास आयुक्तालयाच्यावतीने (Tribal Development Commissioner) सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन शुक्रवार दि.10 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी (Maharashtra Police Academy) नाशिक येथे करण्यात आले आहे.

- Advertisement -

या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत 1016 मुले व 1016 मुली असे एकूण 2032 खेळाडू विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती आदिवासी विकास आयुक्तालयाचे अपर आयुक्त (Additional Commissioner) (मुख्यालय) तुषार माळी यांनी दिली. या स्पर्धा 14,17 व 19 अशा तीन वयोगटात होणार आहे.

यामध्ये कबड्डी,खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, चार बाय शंभर रिले व चार बाय चारशे रिले तसेच इत्यादी सांघिक खेळांचा समावेश आहे. याबरोबरच धावणे,चालणे, लांब उडी, उंच उडी, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक इत्यादी वैयक्तिक खेळांचाही यामध्ये समावेश आहे . या स्पर्धेत अपर आयुक्त नाशिक ठाणे, अमरावती व नागपूर या विभागाचे संघ सहभागी होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या