Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यास्वातंत्र्यदिनाला ध्वजारोहणाचा प्रश्न सुटला; नाशिकसह १९ जिल्ह्यांत 'हे' मंत्री करणार ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनाला ध्वजारोहणाचा प्रश्न सुटला; नाशिकसह १९ जिल्ह्यांत ‘हे’ मंत्री करणार ध्वजारोहण

मुंबई | Mumbai

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) नुकताच पार पडला. या विस्तारात शिंदे गटातील (Shinde Group) नऊ आणि भाजपच्या (BJP) नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली…

- Advertisement -

यानंतर स्वातंत्र्य दिनाला (Independence Day) प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री ध्वजारोहण करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अद्याप खातेवाटप झाले नसल्यामुळे ध्वजारोहण कोण करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यासाठी आज राज्यातील प्रत्येक मंत्र्यांना एक जिल्हा देण्यात आला आहे. 19 जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांच्या खांद्यावर असणार आहे. तर उर्वरित ठिकाणी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील, अशी माहिती मिळाली आहे.

नाशकात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

कोणत्या जिल्ह्यात मंत्री करणार ध्वजारोहण?

देवेंद्र फडणवीस – नागपूर

सुधीर मनगुंटीवार – चंद्रपूर

चंद्रकांत पाटील – पुणे

राधाकृष्ण पाटील – अहमदनगर

गिरीष महाजन – नाशिक

दादा भुसे – धुळे

गुलाबराव पाटील – जळगाव

रविंद्र चव्हाण – ठाणे

मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

दीपक केसरकर – सिंधुदुर्ग

उदया सामंत – रत्नागिरी

अतुल सावे – परभणी

संदीपान भुमरे – औरंगाबाद

सुरेश खाडे – सांगली

विजयकुमार गावित – नंदुरबार

तानाजी सावंत – उस्मानाबाद

शंभूराज देसाई – सातारा

अब्दुल सत्तार – जालना

संजय राठोड – यवतमाळ

सांगा जगायचं तरी कसं? शेतात चार फुट पाणी, पावसानं सर्व काही हिरावून नेलं, पाहा व्हिडीओ…

अमरावतीमध्ये विभागिय आयुक्त तर कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलढाणा, पालघर आणि नांदेड याठिकी तेथील जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करणारे मंत्रीच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या