Monday, December 2, 2024
Homeनगरराज्यात 98 कारखान्यांकडून 40 लाख टन उसाचे गाळप

राज्यात 98 कारखान्यांकडून 40 लाख टन उसाचे गाळप

जिल्ह्यात अंबालिका, ज्ञानेश्वर ऊस गाळपात आघाडीवर

नेवासा |Newasa

यंदाचे गळीत हंगामात राज्यातील 98 साखर कारखान्यांनी 27 नोव्हेबर 2024 अखेर 40.07 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 27.77 लाख क्विंटल साखर निर्मिती केली आहे. या वर्षीच्या 2024-25 या गळीत हंगामात राज्यातील 46 सहकारी व 52 खाजगी अशा एकूण 98 साखर कारखान्यांनी 15 नोव्हेबर पासून गळीत हंगाम सुरु केलेला आहे.
विधानसभा निवडणुकीमुळे ऊस तोड़ कामगार येण्यास उशीर झाल्याने पूर्ण क्षमतेने उस गाळप होऊ शकलेले नाही तर काही साखर कारखान्यांचे अध्यक्षच निवडणुकीला उभे असल्याने काही साखर कारखाने उशीराने सुरु होत आहेत.

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील 14 साखर कारखान्यानी केले 5.26 लाख टन उसाचे गाळप
27 नोव्हेबर अखेर नगर जिल्ह्यातील 8 सहकारी व 6 खाजगी अशा 14 कारखान्यांनी एकूण 5 लाख 26 हजार 908 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 3 लाख 18 हजार 673 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 6.05 टक्के आहे. या पैकी 8 सहकारी साखर कारखान्यांनी 2 लाख 65 हजार 56 मे.टन उसाचे गाळप करून 1 लाख 42 हजार 665 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. तर 6 खाजगी साखर कारखान्यांनी 2 लाख 61 हजार 852 मे.टन उसाचे गाळप करून 1 लाख 76 हजार 8 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. नगर जिल्ह्यातील अंबालिका साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 23 हजार 205 टन उसाचे गाळप करुन जवळपास एक लाख क्विंटल साखरेची निर्मिती केली. तर गणेश कारखान्याने सर्वात कमी 6 हजार 50 टन उसाचे गाळप केले.

नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात केलेले ऊस गाळप, साखर उत्पादन व उतारा

अ.नं. कारखाना ऊस गाळप साखर उत्पादन उतारा
मे. टन क्विंटल टक्के

1) संजीवनी 21,310 6,750 8.63
2) कोळपेवाडी 28,042 9,300 9.01
3) गणेश 6,050 475 2.73
4) अशोक 28,930 19,000 6.78
5) प्रवरा 29,000 8,600 5.5
6) संगमनेर 56,700 41210 7.35
7) ज्ञानेश्वर 79,525 48300 8.28
8) अगस्ती 15,499 9030 8.73
9) क्रांती शुगर 29,115 22,635 9.07
10) अंबालिका 1,23,205 99,750 8.56
11) गंगामाई 73,490 38,650 5.75
12) प्रसाद शुगर 6810 1250 6.64
13) बारामती अ‍ॅग्रो 17,325 1,0740 6.63
14) ढसाळ अ‍ॅग्रो 11,907 2,983 7.5
एकूण 5,26,908 3,18,673 6.05

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या