Thursday, May 2, 2024
Homeनाशिकशारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे निवेदन

शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे निवेदन

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या संच मान्यतासंदर्भातील जाचक अटी तातडीने रद्द करण्यात याव्यात, संच मान्यतामध्ये शारीरिक विषयाचा समावेश करण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने खा. हेमंत गोडसे, आ. सरोज अहिरे व माजी खासदार समीर भुजबळ यांना देण्यात आले.

- Advertisement -

या निवेदनामध्ये म्हटले आहे की, संचने मान्यतेसंदर्भातील 28 ऑगस्ट व 7 ऑक्टोबर 2015 मध्ये दोन्ही जाचक शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा. शारीरिक शिक्षण विभागाची पदे भरताना शारीरिक शिक्षण विषयाच्या पूर्ण कार्यभराची जाचक अट रद्द करून पूर्वीप्रमाणे शिक्षण बायफोकल पद्धतीने भरती करावी, संच मान्यतामध्ये शारीरिक विषयाचा समावेश करण्यात यावा, 50 टक्के शाळा तेथे शारीरिक शिक्षण शिक्षक यांची नियुक्ती करण्यात यावी,

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी इयत्ता सहावी ते दहावी हा विशेष विषयस्तर निर्माण करण्यात यावा, खेळाडूंना अपघात विमा लागू करण्यात यावा, राज्य क्रीडा धोरण 2012 मधील सर्व तरतुदींची अंमलबजावणी करण्यात यावी, केंद्रीय बोर्डप्रमाणे व राज्याच्या क्रीडा धोरणानुसार यशपाल समितीची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर नाशिक जिल्हा शिक्षण शिक्षक संघाचे गणेश भगरे, सनी राय, शक्ती गाडेकर आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या