Thursday, May 2, 2024
Homeनाशिक'टोल बंद’ साठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे

‘टोल बंद’ साठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे

नाशिक | Nashik

नाशिक-पुणे हायवे (Nashik Pune Highway) व नाशिक-मुंबई महामार्ग (Nashik-Mumbai Highway) रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच शिंदे व घोटी टोलमध्ये (Shinde Toll Naka) असलेली सदोष यंत्रणा याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आलेली आहेत….

- Advertisement -

वाहतूकदारांसह सामान्य नागरिकांना रस्त्याने जर सुविधा मिळत नसतील तर टोल का भरावा, असा प्रश्न वाहतूकदारांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती (Road Damaged) करण्यात येत नाही, तोपर्यंत टोल बंद करावा, अशी मागणी नाशिक डिस्ट्रीक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (Nashik District Transport Association) वतीने केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना करण्यात आली आहे.

याबाबत नाशिक डिस्ट्रीक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी राज्याचे सार्वजनिक घोटी टोल नाक्यावर (Ghoti Toll Naka) वाहतूकदारांना बांधकाम विभागमंत्री अशोक चव्हाण, विविध अडचणींचा सामना करावा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक लागत आहे. ज्या शिंदे, पळसे व घोटी टोल नाक्यावर टोल घेतला जातो त्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. टोल व्यवस्थापक यांना निवेदन दिले.

या ठिकाणी व्यवस्थापनाकडून नाशिक पुणे हायवेवरील शिंदे टोलवर कुठलीही डागडुजी होताना दिसत नाही. पळसे व नाशिक मुंबई हायवेवरील आम्ही टोल द्यायला तयार आहोत. मात्र टोल अंकित रोड आणि त्याच्या सर्व सुविधा चांगल्या प्रतीच्या द्याव्यात.

जोपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणार नाही तोपर्यंत टोल घेऊ नये. जर टोल भरण्यास प्रशासनाने बळजबरी केली तर वाहतूकदार व नागरिक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या