Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यासमृद्धी महामार्गावर सेवा सुविधांची अद्याप प्रतीक्षाच

समृद्धी महामार्गावर सेवा सुविधांची अद्याप प्रतीक्षाच

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) नागपूर (nagpur) ते मुंंबई (mumbai) समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) शिर्डी (shirdi) पर्यंत पुर्ण झाला असला तरी

- Advertisement -

सेवा सुवीधांंची (facilities) प्रतीक्षा अद्याप कायम आहे. फूड प्लाझा (Food Plaza) आणि इतर सुविधा पुरविण्यासाठी 16 ठिकाणे निश्चीत केली असलीतरी त्यांना विकासकांकडुन किती प्रतीसाद मिळतो यावर समृध्दीवरील समृध्द प्रवासाचे भवितव्य अवलंबुन आहे.

56 हजार कोटी रुपयांंचा हा प्रकल्प दहा जिल्ह्यांमधुन 390 गावांना जोडत निघाला आहे. महाराष्ट्राच्या (maharashtra) अर्थकारणावर या महामार्गामुळे चांगला परिणाम होणार असल्याचा विश्वास राज्यकर्त्यांना आहे. समृद्धी महामार्गातील (Samruddhi Highway) नागपूर ते शिर्डी असा 520 किमीचा टप्पा 11 डिसेंबरपासून सुरु झाला आहे. शिर्डी ते नागपुर एसटी बस (ST Bus) ही सुरु झाली आहे. पाच तासात शिर्डीहुन नागपुरला जाता येते. असे म्हटले असले तरी त्या पध्दतीचीही वाहनेही सक्षम असणे गरजेचे आहे. त्या शिवाय ते शक्य दिसत नाही. त्याचा अनुभव आजही नागरीक घेत आहे.

जुन्या वाहनांना आजही आठ तास प्रवासास लागतात. या महामार्गालगत खानपान, प्रसाधन गृह, गॅरेज आणि इतर सुविधा अद्याप नाहीत. एखादा पेट्रोल पंंप (Petrol pump) येई पर्यंत प्रतीक्षा करावी लागते. पेाट्रोल पंंपावर गेले तरी तेथे वेफर्स, चॉकलटे्स, चहा, कॉफी, पाण्याच्या बाटली शिवाय फारसे काही नसते. त्यामुळे, मोठी गैरसोय होते. प्रसाधान गृहातही पाणी असेलच याची शाश्वती देता येईत नाही.

महामार्गासाठी आवश्यक पुरेशा सुविधा (facilities) अद्याप उभ्या नसल्याने. इंधनापासून ते हॉटेल, स्वच्छतागृह, वाहन दुरुस्ती केंद्रे अभावी गैरसोय दिसते. दोन्ही बाजुला ओसाड माळरना शिवाय फासे काही दिसतच नाही. दहा जिल्ह्यांची नावे वात केवळ भलामोठा समृध्द महामार्गच पाहुन जावे लागते. त्यामुळे प्रवास करणे वाहनचालकांसाठी जिकीरीचे ठरत आहे. शिर्डी पर्यंत रस्ता खुला करुन दिल्या पासुन गैरसोयी प्रकर्षाने जाणवत आहे.

रस्ते विकास महामंडळाने (Road Development Corporation) हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी महामंडळाने ‘लँड पुलिंग’ योजने (‘Land Pulling’ scheme) अंतर्गत जमीन मालकांकडून जमीन घेऊन त्या विकसित करायच्या, जमिनीची मालकी मात्र त्यांच्याकडेच कायम ठेवायची, अशी योजना आहे. यानंतर ही जमीन विविध सुविधा उभारणीसाठी कंत्राटदारांना भाडेतत्त्वावर दिली जाणार आहे.

या योजनेंतर्गत आठ ठिकाणी मुंबई-नागपूर (mumai-nagpur) व नागपूर-मुंबई या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी 4 हेक्टरवर सुविधांची उभारणी करण्याचे नियोजन केले आहे. एका 16 ठिकाणी अशा सुविधा असतील. प्रत्येक ठिकाणासाठी किमान 50 कोटी रुपयांचा खर्च संबंधित विकासक व कंत्राटदाराला करायचा आहे. यासाठी पाच वर्षांचा कालवधी निश्चित करण्यात आला आहे. या नवीदाना या महीन्यात कि ती प्रतीसाद मिळतो यावर सुवीधांचे भवितव्य अवलंबुन आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या