Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्याबनावट कीटकनाशकांचा साठा जप्त

बनावट कीटकनाशकांचा साठा जप्त

ओझे l वार्ताहर Oze

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व भाजीपाला ही पिके मुख्य असून खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांकडून किटकनाशकाचा (pesticides)मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यादृष्टीने आज कृषी विभागाच्या भरारी पथकाकडुन दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी ( Talegaon , Dindori ) येथील नंदिनी किचन अ‍ॅप्लीकेशन प्रा.लि. यांच्या आवरात बनावट किटकनाकाचा साठा असल्याचा संशय कृषी विभागाला आल्यामुळे कृषी विभागाने तात्काळ कारवाई केली आहे.

- Advertisement -

अधिकृत किटकनाशके विक्रेते यांचे व्यतिरिक्त शेतकऱ्यांना अनाधिकृत व्यक्तीकडून कमी दरात बनावट किटकनाशके उपलब्ध करून दिले जात असल्याचा संशय कृषी विभागास होता.त्यादृष्टीने कृषी विभागाने सापळा रचून विभागीय कृषी सहसंचालक नाशिक मोहन वाघ यांचे आदेशानुसार ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे तंत्र अधिकारी (गु.नि) संजय शेवाळे, यांचे मार्गदर्शनाखाली श्री.नितेंद्र पानपाटील ,विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांचे सहकार्याने जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री.अभिजीत घुमरे यांनी ही कारवाई केली आहे.जिल्हा भरारी पथकाने बनावट किटकनाशकाचा सुमारे २९५ किलो/लिटरचा साठा जप्त केला असून, त्याचे बाजार मूल्य सुमारे रु.६.१६ लाख एवढे आहे.

कारवाईच्या वेळी कृषी अधिकारी प.समिती दिंडोरी श्री.दिपक साबळे, कृषी अधिकारी, पंचायत समिती दिंडोरी हे उपस्थित होते.

संशियत दिपक मोहन अग्रवाल यांच्या विरुद्ध किटकनाशक कायदा १९६८, किटकनाशक नियम १९७१,पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत .अभिजीत घुमरे , जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नाशिक यांनी पोलिस ठाणे दिंडोरी येथे फिर्याद क्रमांक गुरनं ३४६/२२ दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या