Friday, May 3, 2024
Homeनाशिकअज्ञातांकडून बसवर दगडफेक; गुन्हा दाखल

अज्ञातांकडून बसवर दगडफेक; गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दोन अज्ञात व्यक्तींनी एसटी महामंडळाच्या बसवर (MSRTC) दगड फेकून (stone pelting) काच फोडल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला…

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लासलगाव (Lasalgaon) आगाराची बस (एमएच 14 बीटी 4556) येवला येथून नाशिककडे येत असताना हॉटेल मिर्ची सिग्नलजवळ औरंगाबाद रोड येथे काळ्या रंगाच्या ॲक्टिवा गाडीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी बसवर दगड फेकून घटनास्थळावरून पळ काढला.

याप्रकरणी चालक दिगंबर हरी आगवन (52, रा. येवला) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या