Sunday, June 14, 2026
HomeनगरAhilyanagar : बिबट्या पाठोपाठ जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

Ahilyanagar : बिबट्या पाठोपाठ जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

वर्षभरात 57 हजार 836 जणांना चावा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बिबट्या पाठोपाठ जिल्ह्यात श्वान चाव्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरसह ग्रमीण भागात मोकाट श्वानांच्या झुंडी दिसत आहेत. मोकाट श्वानाचा बंदोबस्त होतांना दिसत नसल्याने गेल्या पाच वर्षात एकट्या नगर जिल्ह्यात 2 लाख 52 हजार जणांचे श्वानांनी लचके तोडून जखमी केले असून, पाच जणांचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे. 2025- 57 हजार 836 जणांना कुत्र्याने चावा घेतला. जिल्हा आरोग्य यंत्रणेने श्वान दंशावर केलेल्या लसीकरणावरून ही माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाच वर्षांत (वर्ष 2021-25) 2 लाख 52 हजार जणांना अहिल्यानगर शहरासह ग्रामीण भागात मोकाट श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण आहे. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक त्रस्त आहेत. चार ते दहा श्वानांचे झुंड चौकाचौकात पाहावयास मिळत आहेत. शंभर-दोनशे मीटर अंतरापर्यंत वाहन चालकांचा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. येणार्‍या-जाणार्‍यांची वाट अडवून धरणार्‍या मोकाट श्वानांचा वेळीच बंदोबस्त होण्याची गरज आहे.

वर्षनिहाय श्वानांचा दंश वर्ष आणि श्वानदंश केसेस

2021 – 34 हजार 559
2022 – 66 हजार 950
2023 – 53 हजार 772
2024 – 38 हजार 965
2025- 57 हजार 836 असे आहे.

घराबाहेर पडणे धोक्याचे
मोकाट कुत्र्यांच्या धास्तीने सायंकाळ होताच एकट्याने घराबाहेर निघणे अवघड झाले आहे. लहान मुलांपासून, तर मोठ्यांपर्यंत शहरांप्रमाणे ग्रामीण परिसरातही दहशतीचे वातावरण आहे. पुरुषांच्या तुलनेत लहान मुले व महिलांवर श्वानांचे आक्रमण होण्याचे प्रमाण अधिक आहे.

बंदोबस्त करण्याची गरज
कर्मचारी, विद्यार्थ्यांना सकाळी घराबाहेर पडताना, तसेच सायंकाळनंतर घरी परतताना मोकाट श्वानांच्या उपद्रवाचा सामना करावा लागतो. हे श्वान रस्त्याने जात असताना दुचाकी, चारचाकी वाहन चालकांवर प्राणघातक हल्ला करतात. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. मोकाट श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी त्यांचे आरोग्य विभागाच्या वतीने निर्बीजीकरण करणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...