Monday, May 20, 2024
Homeजळगावphotos # विद्यार्थ्यांमधून नवनवीन संशोधन जगापुढे येणार!

photos # विद्यार्थ्यांमधून नवनवीन संशोधन जगापुढे येणार!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

संशोधन (Research) ही काळाची गरज आहे आणि तांत्रिक बदल (Technical changes) सतत वेगाने सुरु आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील ( students) संशोधन वृत्तीला (Research attitude) अधिक चालना मिळाली पाहिजे. याकरिता अविष्कार संशोधन स्पर्धा (Invention Research Competition) 2006 पासून विद्यापीठ व राज्यस्तरावर (University and State level) सुरु आहे. यातून नवनवीन संशोधन (Innovative Research ) जगापुढे येईल, असा आशावाद कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी (Vice-Chancellor Prof.V.L.Maheswari) यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजित जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा 2022 चे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य सं.ना.भारंबे, डॉ.के.जी.खडसे, जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेचे समन्वयक भूषण कविमंडन, सहसमन्वयक मनोज चोपडा आदी उपस्थित होते.

कुलगुरू कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी पुढे म्हणाले की, तीन मुलभूत संकल्पना संशोधक विद्यार्थ्याने पाळल्या पाहिजे. आपण जे संशोधन करत आहोत, त्यात काय समाविष्ट करायचे आहे. दुसरे सहसंबंध आणि तिसरे सादरीकरणामुळे आपले कार्य योग्य पद्धतीने सादर होईल. विद्यापीठ स्तरावर चार विद्यार्थीभिमुख कार्यक्रम राबवले जातात.

अविष्कार ज्यात संशोधन, अश्वमेध यात क्रीडा, इंद्रधनुष्य यात सांस्कृतिक आणि आवाहन यात आपत्ती व्यवस्थापन या कार्यक्रमातून विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे सहभाग घेऊन त्याचे कौशल्य विकसित होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक डॉ.भूषण कविमंडन यांनी तर सूत्रसंचालन विजय लोहार यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

लाकडी, लोखंडी स्प्रिंगचे संशोधन मॉडेल्स

जीवन पाटील या विद्यार्थ्यांने लाकडाचे तुकडे, लोखंडी स्प्रिंग, यासह वायर यासह इ. साधने वापरून फ्लायव्हील मेकॅनिकल नामक बॅटरी व जनरेटर तयार केली. यात साठविलेली वीज ही हवी त्या वेळी वापरता येईल. कमी खर्चात हे मॉडेल तयार झाल्याची माहिती या विद्यार्थ्यांने दिली. दरम्यान, सौरऊर्जेवर चालणारी पार्किंग, रिमोट वर चालविता येणारे विजेचे दिवे, शेतीकरीता इंधन तसेच विजेवर चालणारे बुजगावणे, घाट वळणावर होणारे अपघात टाळले जावे, यासाठी सोलरवर चालणारे सेन्सर, शेतीसाठी उपयुक्त अशी बेटरीवर आधारित काठी, सेंद्रिय शेतीवर आधारित उत्कृष्ट मॉडेल तयार केले आहे.

अविष्कार पोस्टर स्पर्धेचे कुलगुरुंच्या हस्ते उद्घाटन

जिल्हास्तरीय अविष्कार पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या बास्केटबॉल प्रांगणात व विविध संशोधन मॉडेल्सची पदार्थ विज्ञान प्रशाळेत करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या