Friday, May 3, 2024
Homeनाशिककरोना जनजागृतीसाठी जांगडा यांची नाशिक ते शिर्डी धाव

करोना जनजागृतीसाठी जांगडा यांची नाशिक ते शिर्डी धाव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना विषयक जनजागृती करण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जांगडा यांनी आज नाशिक ते शिर्डी 90 किलोमीटर अंतर धावत पूर्ण करून करोनाचे संकट दूर करण्यासाठी साई चरणी साकडे घातले.

- Advertisement -

सुभाष जांगडा यांनी शनिवारी (दि.26) पहाटे 4.30 वाजता नाशिकच्या सातपूर येथील दत्त मंदिरात दर्शन घेऊन धावण्यास सुरुवात केली. दुपारी 3.12 वाजेच्या सुमारास त्यांनी नाशिक ते शिर्डी अंतर पूर्ण करत शिर्डी येथे साईबाबा यांचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांच्या समवेत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ सल्लागार जयपाल शर्मा, दादा देशमुख, विशाल पाठक, राजेंद्र सहानी, राजेश इसर्वाल, राजवीर जांगडा, राहुल जांगडा, योगिता निकम राजपूत, रुपाली मुंढे, दिनेश जांगडा, नवीन वर्मा, सचीदानंद शुक्ल आदी सहभागी झाले होते.

गेल्या पाच वर्षापासून सुभाष जांगडा हे नाशिक ते शिर्डी विविध सामाजिक संदेश देण्यासाठी धावत असतात. सुभाष जांगडा यांचे यंदाचे सहावे वर्ष असून त्यांनी आज नाशिक ते शिर्डी हे 90 किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण करत कोरोनाविषयक जनजगृती केली.

या अगोदर जांगडा यांनी बेटी बचाव, बेटी पढाओ, स्त्री भृण हत्या, स्वच्छ भारत अभियान, पाणी बचाव मोहीम याबाबत त्यांनी जनजागृती केली आहे. यंदाच्या वर्षी त्यांनी कोरोना विषयक जनजागृती करत कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी साईचरणी साकडे घातले. तसेच कोरोना विषयक दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

त्यांनंतर त्यांचे नाशिकरोड, सिन्नर, पांगरी, वावी यासह गावागावात त्यांचे स्वागत करण्यात आले. दुपारी 3.12 वाजता त्यांनी नाशिक ते शिर्डी अंतर पूर्ण केले. त्यांच्या सोबत असलेले सहकारी देखील त्यांचा सोबत धावले. शिर्डी येथे पोहचल्यानंतर याठिकाणी सुभाष जांगडा यांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या