Tuesday, September 8, 2026
Homeनगरउसाच्या शेतात मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ

उसाच्या शेतात मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ

बेलवंडी |वार्ताहर| Belwandi

श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील उक्कडगाव (Ukkadgaon) शिवारातील गट क्रमांक 43 मधील ऊसाच्या शेतात एका अनोळखी पुरुष व्यक्तीचा मानवी सांगाडा (Human Skeleton) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उक्कडगाव येथील शेतकरी दशरथ सोपान गोलांडे (वय 69) हे आपल्या ऊसाच्या शेतात (Sugarcane Farm) गवत काढण्याचे काम करत असताना त्यांना शेतात मानवी सांगाडा आढळून आला. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती बेलवंडी पोलिसांना दिली.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांनी (Belwandi Police) घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्राथमिक पाहणीत हा सांगाडा अंदाजे तीन ते चार महिन्यांपूर्वीचा असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी मानवी सांगाड्याजवळ एक फुल बाह्यांचा आकाशी रंगाचा शर्ट, पांढर्‍या रंगाचे बनियन तसेच विटकरी रंगाची चप्पल आढळून आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जावेद शेख करीत आहेत. दरम्यान, या वर्णनातील व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास बेलवंडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...