बाभळेश्वर |वार्ताहर| Babhaleshwar
राहाता (Rahata) तालुक्यातील लोणी खुर्द (Loni Khurd) रोडम वस्ती येथील शेतकरी बापूसाहेब हरिभाऊ आहेर यांच्या शेतात विखे कारखान्याची तोड चालू असताना मजुरांना गुरुगुरण्याचा आवाज आला. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांनी मालकास बोलविले. त्यावेळेस मजुरांची आरडाओरड सुरू असताना उसाच्या शेतीमधून घाबरून एक मादी पिल्लू (Leopard Cubs) शेतीतून बाहेर आले.
प्रत्यक्षात बिबट्याचे मादी पिल्लू (Leopard Cubs) पाहिल्यामुळे ऊस तोडणी कर्मचारी घाबरून गेले. उसातून पिल्लू बाहेर आल्याने या उसामध्ये इतर पिल्ले अथवा मादी असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. त्यामुळे मजुरांनी ऊस तोडणी बंद केली. शेतीचे मालक बापूसाहेब आहेर यांनी त्वरित वन विभागाशी संपर्क केला. वन अधिकारी श्री. साखरे व श्री. गजेवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ते बिबट्याचे पिल्लू (Leopard Cubs) पुन्हा त्याच ठिकाणी ठेवण्यास सांगितले.
कारण इतर पिल्ले व मादी या उसाच्या फडातच असण्याची शक्यता होती. अधिकार्यांनी त्या शेतीची सुद्धा पहाणी केली. त्यानुसार उसाची तोड (Sugarcane Cutting) सुद्धा त्यादिवशी बंद ठेवण्यात सांगितली होती. दुसर्या दिवशी उसाची तोड सुरू केली असता पिल्ले आढळली नाही. त्यामुळे मादी व त्यांची पिल्ले परिसरातच फिरत असल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरी वन विभागाने या परिसरात पिंजरा (Cage) लावण्याची मागणी लोणी खुर्द परिसरातील शेतकरी करीत आहेत.