Saturday, June 20, 2026
Homeनगरउसावर पांढरी माशी आणि तपकिरी ठिपके रोगाचा प्रादूर्भाव

उसावर पांढरी माशी आणि तपकिरी ठिपके रोगाचा प्रादूर्भाव

राहाता |प्रतिनिधी| Rahata

ऊस पिकावर सध्या पांढरी माशी किडीचा आणि तपकिरी ठिपके रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. पांढरी माशी ही कीड उसाच्या पानांच्या पाठीमागच्या बाजूने शिरेजवळ अंडी घालते आणि त्यातून बाहेर पडलेली पिल्ले कोवळ्या पानांमधून रस शोषण करतात. कीडग्रस्त पानांवर काळपट ठिपके दिसतात. ही ठिपके म्हणजे या किडीचे कोष आहेत. कोषातून बाहेर पडलेली प्रौढ माशीसुद्धा उसाच्या पानांमधून मोठ्या प्रमाणात रस शोषण करते. त्यामुळे पाने सुरुवातीला पिवळसर आणि नंतर कोरडी होऊन वाळून जातात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे ऊस कमकुवत होतो, उसाची वाढ खुंटते आणि ऊस उत्पादनात घट येतो. यासाठी शेतकर्‍यांनी वेळीच उपाययोजना करावी, असे आवाहन पायरेन्स लोणी संचलित कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वरचे भरत दंवगे यांनी केले.

- Advertisement -

उसाच्या पानांवर आढळून येणारे तपकिरी ठिपके हा बुरशीजन्य रोग असून पावसाळ्यामध्ये या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. वातावरणामध्ये दमटपणा आणि ढगाळ हवामान असताना ही बुरशी पानांवर मोठ्या प्रमाणावर वाढते आणि त्यामुळे उसाच्या पानांवर लालसर तपकिरी ठिपके पडून पाने वाळून जातात आणि ऊस उत्पादनात घट येतो. उसावरील पांढरी माशी आणि तपकिरी ठिपके रोग यांच्या नियंत्रणासाठी पिकावर 200 लिटर पाण्यात 70 ग्रॅम क्लोथियानिडीन किंवा 200 ग्रॅम असिटामीप्रिड अधिक 500 ग्रॅम झायनेब यांची एकत्रित फवारणी करावी.

मात्र उसावर ड्रोनद्वारे फवारणी करावयाची असल्यास प्रति एकरी 200 मिली स्पिरोटेट्रामॅट हे किटकनाशक अधिक 200 मिली अझॉक्सिस्ट्रॉबीन अधिक डायफेनोकोनाझोल हे संयुक्त बुरशीनाशक यांची एकत्रित फवारणी करावी. अधिक माहितीसाठी कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे संपर्क साधावा, असेही श्री. दंवगे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Crime News : पूर्ववैमनस्यातून दगडफेक करत मारहाण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जुन्या भांडणाची कुरापत काढून गुंडेगाव येथे एका समाजाच्या वस्तीवर दगडफेक आणि मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात...