Thursday, May 2, 2024
Homeनाशिककांदा चाळीतच गळफास घेत संपवले जीवन

कांदा चाळीतच गळफास घेत संपवले जीवन

लोहणेर । वार्ताहर

लोहणेर-खालप रस्त्यावरील शेतात असलेल्या कांदा चाळीत लोहणेर येथील कांतीलाल बन्सीलाल परदेशी (वय 50) या इसमाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे.

- Advertisement -

बन्सीलाल गुळेचा यांच्या शेतातील कांदा चाळीत हा प्रकार घडला. दुपारच्या सुमारास परदेशी यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

यानंतर देवळा पोलिसांना पाचारण करण्यात आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

मृत कांतीलाल परदेशी यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. माजी ग्रा.पं. सदस्य रतीलाल परदेशी यांचे ते लहान बंधू होत.

- Advertisment -

ताज्या बातम्या