Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

नाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील सातपूर परिसरातील (Satpur Area) राधाकृष्णनगर येथे एकाच कुटुंबातील तीन जणांनी गळफास घेत राहत्या घरात आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक सुपडू शिरोडे (५५) प्रसाद दीपक शिरोडे (२५) व राकेश दीपक शिरोडे (२३) असे आत्महत्या केलेल्यांची नावे असून ते राधाकृष्णनगरमधील धनाई पुनाई रो हाऊसमध्ये राहत होते. तसेच हे तिघे जण अशोकनगर भाजी बाजारजवळ फळांच्या विक्रीचा व्यवसाय (Business) करत होते. मात्र, आज दुपारच्या सुमारास त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

दरम्यान,घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे (Satpur Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण व सतीश घोटेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital) पुढील तपासणीसाठी पाठवले. तसेच याप्रकरणी पोलीस तपास सुरु असून मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या