Tuesday, July 2, 2024
Homeमहाराष्ट्रराज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड

राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड

'यांना' मिळाली संधी

मुबंई | Mumbai

- Advertisement -

राज्याचे मुख्य सचिव म्हणून नितीन करीर (Nitin Kareer) हे काम बघत होते. करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता.परंतु, त्यांचा तो कालावधी दोन दिवसांपूर्वी संपल्यानंतर आता या पदावर सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : देशात उद्यापासून लागू होणार नवीन फौजदारी कायदे; जाणून घ्या, काय होणार बदल?

सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांनी याआधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदी बढती मिळाली आहे. सुजाता सौनिक यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ मिळणार असून जून २०२५ मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. सौनिक या वरिष्ठ आयएएस अधिकारी असून सेवाज्येष्ठतेनुसार त्या वरिष्ठ होत्या. यानंतर राजेश कुमार (१९८८) व इक्बालसिंह चहल (१९८९) हे दावेदार होते.

हे देखील वाचा : T20 World Cup 2024 : रोहित शर्मा-विराट कोहलीचा टी-२० क्रिकेटला अलविदा

३१ डिसेंबर रोजी नियुक्त झालेले नितीन करीर हे या वर्षी मार्चमध्ये निवृत्त होणार होते. मात्र, करीर यांचा कार्यकाळ तीन महिन्यांनी वाढविण्यात आला होता. अखेर करीर यांच्यानंतर सुजाता सौनिक यांना संधी देण्यात आली आहे.आज सायंकाळी सौनिक या मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.

हे देखील वाचा : शेतकऱ्यासह नाेकरदार शेअरचे बळी; चाैघांना आमिष दाखवून टेलिग्रामवरुन ‘इतक्या’ लाख रुपयांचा गंडा

दरम्यान, सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ अधिकारी असून त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. याआधी मनोज सौनिक (Manoj Sainik) यांनी राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले असून सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे आता पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बँकेत ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा

सुजाता सौनिक कोण आहेत?

सुजाता सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगड येथे झाले आहे.त्यांनी पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव, गृहमंत्रालय सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळलेला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या