Monday, May 20, 2024
Homeनगर'अरे बाप रे...'! सनी देओलला पाहिल्यानंतर नगरमधील शेतकऱ्याची रिॲक्शन, VIDEO व्हायरल

‘अरे बाप रे…’! सनी देओलला पाहिल्यानंतर नगरमधील शेतकऱ्याची रिॲक्शन, VIDEO व्हायरल

अहमदनगर | Ahmednagar

सन २००१ मध्ये आलेला गदर चित्रपटाला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले होते. आता याच हिट गदर: एक प्रेम कथेच्या सीक्वलबरोबर मोठ्या पडद्यावर सनी देओल आणि अमिषा पटेल एकत्र दिसणार आहेत.

- Advertisement -

गदर २ चे शुटिंग सुरू झाले असून प्रेक्षकांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अहमदनगरच्या ग्रामीण भागात या सिनेमाचं शूटींग सुरू आहे. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सनी देओलने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

महानायक अमिताभ बच्चन यांचा शूटिंगदरम्यान अपघात, बरगड्यांना इजा
देशात नवा व्हायरस? सर्दी-खोकला लवकर बरा होईना…; ICMR कडून मार्गदर्शक सूचना जारी

सनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक शेतकरी बैलगाडीतून येताना दिसत आहे. तेव्हा सनी आणि त्याच्यासोबत असलेल्या काही व्यक्तींनी शेतकऱ्याला थांबण्यासाठी सांगितलं. त्यानंतर सनीने शेतकऱ्यासोबत गप्पा मारायला लगला. पु्ढे शेतकरी सनीला म्हणाला, ‘तू सनी देओल सारखाचं दिसत आहेत.’ त्यानंतर अभिनेता म्हणाला, ‘सनी देओलच आहे…’ सनीला समोर पाहून शेतकरी हैराण झाल्याचं चित्र व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अभिनेत्री Tunisha Sharma च्या आत्महत्या प्रकरणात शिझान खानला जामीन मंजूर

२२ वर्षांनंतर रिलीज होणाऱ्या गदरच्या या सिक्वेलची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सनीचा गदर-२ हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनिल शर्मा हे गदर-2 चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात सनीसोबतच अमिषा पटेल देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा तारा सिंह आणि सकिना अर्थात सुपरस्टार सनी देओल, अमिषा पटेल यांची जोडी पाहायला मिळणार आहे.

Vada Pav : जगातील सर्वोत्तम सँडविचेसच्या यादीत ‘वडापाव’चा समावेश

- Advertisment -

ताज्या बातम्या