नाशिक । प्रतिनिधी Nashik
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुपर 50 उपक्रमाच्या निवड परीक्षेसाठी दि. 6 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती, विद्यार्थ्यांच्या सोयीकरता ऑफलाईन पद्धतीने होणारी नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करण्यात आली होती, ऑनलाइन पद्धतीचा परीक्षा अर्ज सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता यावे यासाठी काही शैक्षणिक संस्था व संघटना यांनी परीक्षेसाठीचा अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
या अनुषंगाने सुपर 50 उपक्रमाच्या निवड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 11 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, सदर मुदत वाढ अंतिम असून 11 जुलै रोजी ऑनलाइन प्रवेशाची लिंक रात्री 12 वाजता बंद करण्यात येणार आहे, यानंतर केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. निवड परीक्षेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने देखील भरता येणार आहे.
त्यासाठी खालील लिंकवर जाऊन https://forms.gle/zkRRbs5MKq3et9i36 अथवा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. प्रत्येक पंचायत समिती मध्ये गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात परीक्षेचा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला असून तिथेच तो भरावा लागणार आहे. प्रत्येक तालुक्यात परीक्षेसाठी परीक्षा केंद्र असणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठीचे सर्व नियम व निकष वाचून अर्ज भरावा असे आवाहन सुपर 50 निवड समितीच्या वतीने करण्यात आले आहे.