Thursday, May 2, 2024
Homeनाशिकपोलीस अधीक्षकांचा मोर्चा आता वणव्यांकडे; काय म्हणाले सचिन पाटील?

पोलीस अधीक्षकांचा मोर्चा आता वणव्यांकडे; काय म्हणाले सचिन पाटील?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यात अलीकडे वणवा पेटल्याच्या अनेक घटना घडल्या. निसर्ग व जैवविविधतेचे कधी भरून निघणार नाही इतके अपरिमित नुकसान झाले आहे….(superintendent of police sachin patil on forest fire)

- Advertisement -

वणवा लागताच हातातली कामे सोडून जीव धोक्यात टाकणाऱ्या पर्यावरण मित्रांनी वणवामुक्तीसाठी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याशी नाशिकला नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे (दि २० रोजी)चर्चा केली.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी निश्चित याकामी आम्ही आपल्यासोबत आहोत. वनवामुक्तीसाठी कार्यशाळा व वणवा विझवणाऱ्यांसाठी सुरक्षा साधने, वनव्यवस्थापन समित्यांना प्रशिक्षण दिले जाईल असे ही जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी पर्यावरण प्रेमींना शब्द दिला.

नाशिक जिल्ह्यातील ब्रम्हगिरी,मोरधन,रामशेज किल्ला, हरसूल घाट, मायना डोंगर, मातोरी गायरान, पांजरपोळ, संतोषा (बेळगाव ढगा),मातोरी येथील सुळा डोंगराला वणवा लागण्याच्या घटना या दोन महिन्यात घडल्या.

या घटनांची वनविभागाला खबर देण्यापासून हातातली कामे सोडून, जीव धोक्यात टाकून ओली बारदाने,झाडांच्या हिरव्या फांद्यांनी वणवा झोडपून विझवण्याचे काम शिवकार्य गडकोट संस्था,वृक्षवल्ली फाउंडेशन,दरीमाता पर्यावरण,मंडळे व व्यक्तींनी केले.

त्यांच्या माध्यमातून मोठी हानी वाचली,मात्र वणव्यात हजारो हेक्टर कुरण, जंगल, जैवविविधता, पक्षी, वन्यप्राणी, दुर्मिळ वनौषधी भस्मसात झाली.

याचे कुठलेही ऑडिट वन,पर्यावरण व स्थानिक गावाना केले नाही याबाबतीत दरवर्षी निसर्गाचा घात करणारा वणवा थांबवण्यासाठी,त्याची दाहकता कमी करण्यासाठी जागृती व जाळपट्टे उभारणीसाठी उपाय टास्क फोर्स ने सुचवले मात्र वणवा मात्र थांबला नाही, वणवा लावणारे मोकाट असून वनसंपदा असुरक्षित आहे.

याआधीच वणवा मुक्ती साठी उपायांवर संबंधित विभागाचे गांभीर्य नसल्याची तक्रार यावेळी वणवा विझवणाऱ्या पर्यावरण मित्रांनी केली.

दरम्यान, याकामी पोलीस यंत्रणा आपल्यासोबत असल्याचे सांगून वणवा ठिकाणांना भेटी देऊ, तसेच वणवा लागलेल्या परिसरातील गावाना त्यासंदर्भात भेटून संवाद करू,तसेच वणवा विजवणारे पथकासाठी लागणारे सुरक्षा साहित्य यादी द्या असे ही यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी टेम्भेकर साहेब,नाशिक तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव,यासह शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ,दरीआई माता,पर्यटन व पर्यावरणाचे भारत पिंगळे,शिवाजीभाऊ धोंडगे,प्रदीप पिंगळे पत्रकार तथा पर्यावरण मित्र जितेंद्र साठे,यावेळी उपस्थित होते.

मी गेल्या ६ महिन्यांपूर्वी लघुगटाच्या अहवालात दरवर्षी लागणाऱ्या वनव्याची दाहकता मांडली व सोबत वनवामुक्त अभियानासाठी जागृती,व जंगल डोंगरात जाळपट्टे उभारणी बाबत, तसेच वणवा मुक्ती साठी वनव्यवस्थापन समित्या ना प्रशिक्षण द्यावे,वणवा मुक्ती साठी अभ्यासू वणवा विझवणारे पथके स्थापावी,वणवा लावणारे पकडावे,वने सुरक्षित ठेवावी असे जिल्हा प्रशासनास अहवाल दिला. मात्र, अहवालावर अजूनही कार्यवाही नाही.कार्यवाहीची तातडी झाली असती तर वनव्याची दाहकता कमी झाली असती,मात्र तसे गांभीर्य अजून नाही व वणवा विझवणारे पर्यावरण मित्र,मंडळे,गाव,युवक यांचा पर्यावरण खात्याने सन्मान करावा,त्यांना सन्मानपत्र द्यावे.

राम खुर्दळ – प्रतिनिधी पर्यावरण टास्क फोर्स,नाशिक

वणवा मुक्त अभियान व्यापक जागृतीच्या प्रतीक्षेत आहे. जागृती सोबत पर्यावरण वन्यजीव पक्षी रक्षणासाठी यंत्रणा फिल्डवर असावी. वणवा लागल्यावर झालेल्या नुकसानीचा अहवाल जाहीर करावा. गावोगावी वणवा विझवणारे पथके घडवावी.

तुषार पिंगळे (वृक्षवल्ली वृक्षमित्र)

- Advertisment -

ताज्या बातम्या