Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याभोंगा : करायला गेले काय आणि घडलं भलतंच; जातीवादावरून सुप्रिया सुळे भडकल्या

भोंगा : करायला गेले काय आणि घडलं भलतंच; जातीवादावरून सुप्रिया सुळे भडकल्या

नाशिक l प्रतिनिधी | Nashik

राज्यात भोंग्याचं राजकारण सर्वांनीच पाहिले. भोंग्यावरून काय साध्य झाले? करायला गेले काय आणि झालं भलतंच असे झाले आहे. करायला गेले त्यांचा भोंगा बंद अन् उतरला शिर्डीचा भोंगा, असे म्हणत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली…

- Advertisement -

जातीवादाला आपला विरोध आहे. माझ्यावर हे संस्कार झाले नाहीत याचा मला अभिमान आहे. कोविड काळात औषध बनवणाऱ्या कंपन्यांच्या मालकांची जात कुणी विचारली का हो? ज्या रेमडेसिवीरसाठी रात्रंदिवस रांगा लागायच्या त्या सिप्ला कंपनीचा मालक कोण होता? हे कुणी सांगेल का?

नाशकात आले अन् मिस्सळ खाल्ली नाही तर काय खाल्लं?

युको हमीद हे माझ्या लोकसभा मतदार संघातील मराठी माणूस असून तेच या कंपनीचे सर्वेसर्वा आहेत. करोना काळात कुणी कुणाची जात विचारली का हो, असे म्हणत राज्यात सध्या सुरू असलेल्या जातीयवादावरून खा. सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या