नाशिक | प्रतिनिधी | Nashik
उत्तर भारताला (North India) दक्षिण भारताशी जोडणारा व्यापार उद्योगाला गती देणाऱ्या बहुचर्चित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग (Surat-Chennai Greenfield Highway) प्रकल्पाच्या कामची गती गेल्या वर्षभरापासून संथ झाली आहे. त्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारच्या भारतमाला योजने अंतर्गत सुरत चेत्रई हा एक हजार २७९ किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग उभारण्यात येणार आहे. संपूर्णः औनफिल्ड असलेल्या हा महामार्ग २० पर्यंत २०२६ वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजित होते.
सुरत व चेत्रई या दोन शहरांना जोडणार हा महामार्ग राज्यातील (State) नाशिक, अहिल्यानगर व सोलापूर या जिल्ह्यातून जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात या प्रकल्पाचे अंतर १२२ किलोमीटर असून सुरगाण्यातील राक्षसभुवन येथे राज्याचा एन्ट्री पाईन्ट आहे. तेथून पुढे पेठ, दिंडोरी, निफाड, नाशिक व सित्रर (Nashik and Sinnar Taluka) या तालुक्यामधून तो जाणार आहे. या सहा तालुक्यातील साधारणतः ९९६ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून प्रकल्पाच्या भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) (National Highway Authority) नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर या तिन्ही जिल्हा प्रशासनांना पत्र पाठविले. या पत्रात प्रकल्पाचे कामकाज आहे, त्या टप्प्यावरच स्थगित ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावेळेपासून प्रकल्पाला मिळालेली स्थगिती आजही कायम आहे. परिणामी भू-संपादनाची प्रक्रिया थंडावली आहे. त्यातच आता प्रकल्पाच्या मार्गातच बदल केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासंदर्भात स्थानिक प्रशासनांना कोणत्याच सूचना अद्यापही प्राप्त झाल्या नाहीत, मात्र, हा बदल केल्यास प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची शक्यता धूमर आहे.स्थानिक पातळीचर प्रशासनांनी जमिनींचे दर निश्चित करताना विश्वासात घेतले नसल्याची बाधित शेतकयांची ओरड आहे. या सर्व अनुषंगाने योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची (Farmer) संघर्षांची भूमिका घेतली आहे.
जिल्ह्याचा फायदा
- औद्योगिक विकासाला मिळणार बळ
- सह राज्यातील पर्यटनाला चलना
- उद्योग विस्ताराच्या नवीन बाजारपेठ आवाक्यात येणार
प्रकल्पाचे टप्पे
- सुरत ते सोलापूर ५६४ किलोमीटर
- सोलापूर ते चेन्नई ७०७ किलोमीटर
- अहिल्यानगरमधील ४९ गावांमधील अंदाजे दीड हजार हेक्टर भूसंपादन
- सोलापूर जिल्ह्यातील ३५ गावांतील ६४२.११ हेक्टर भूसंपादन
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू
- या राज्यातून जाणार प्रकल्प
- ग्रीनफिल्ड महामार्ग असणार सहापदरी
- कमाल बेगमर्यादा १२० किलोमीटर
- सुरत-नाशिक प्रवासाचा कालावधी पावणेदोन तास.