Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSuresh Dhas: "४६ कोटी रुपयांची बिलं, १५ जेसीबी आणि १०० हायवा, अवैध...

Suresh Dhas: “४६ कोटी रुपयांची बिलं, १५ जेसीबी आणि १०० हायवा, अवैध राखेचे साठे…”; सुरेश धस यांचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केले. मात्र, या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याचाही सहभाग संतोष देशमुख हत्या प्रकरणात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णु चाटेच्या नावावर ४६ कोटी रुपयांची बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस (BJP Mla Suresh Dhas) यांनी केला आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्यासमोर अनेक मुद्दे मांडले आहेत.

आमदार सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फडणवीसांना ज्यांनी-ज्यांनी वाल्मिक कराडला फरार होण्यास मदत केली होती, त्यासंबंधीचे पुरावे, कागदपत्रं आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिले आहेत. त्या सर्वांना सहआरोपी करावं अशी मागणी धस यांनी केली आहे. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत गंभीर आरोप केले आहे.

- Advertisement -

सुरेश धस नेमके काय म्हणाले?
मुख्यमंत्री येत्या ५ तारखेला आष्टीला येणार आहेत. त्याचे कन्फर्मेशन साहेबांनी दिलेय. मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि सुधारीत प्रशासकीय मान्यतेसह जवळपास २८०० कोटी रुपयांचा प्रकल्प माझ्या मतदारसंघात येत आहे. त्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येत आहेत.

“परळी तालुक्यातील वर्धापूर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर, शिरसाळा पोलीस स्टेशन येथे १० ते १७ वर्षांपासून सतत पदावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात,” अशी मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढे ते म्हणाले, वाल्मिक कराडला फरार होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे नंबर, पुरावे, कागदपत्रे पोलिसांडे दिले आहेत. ते सगळे सहआरोपी झाले पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तसेच परळी नगरपरिषदेचे स्पेशल ऑडिट करण्यात आले पाहिजे. कारण एका व्यक्तीच्या नावावर ४६ कोटी रुपयांची बिले काढण्यात आलेली आहेत. विष्णु चाटे सारख्या आरोपीच्या नावावर हे बिले काढले गेले आहेत. तसेच एकाच रस्त्यावर पाचवेळा बिले काढले गेले आहेत”, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

“करुणा मुंडे यांच्या गाडीत ज्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्याने पिस्तूल ठेवले, तो साडीतला व्यक्ती कोण याचे कटकारस्थान उघड करावे. त्यांना तोंडावर स्कार्फ लावला होता. ते पोलीस अधिकारी आजही बीड पोलीस दलात आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, यांचे निलंबन व्हावे. दोषी सापडले तर सेवेतून काढले जावे. किंवा बाहेर जाऊन नवीन टोळ्या तयार कराव्यात.

एक पोलीस अधिकारी गेल्या १५ वर्षांपासून एकाच ठिकाणी आहे. त्याचे स्वत:चे १५ जेसीबी आणि १०० हायवा आहेत. तसेच परळीमध्ये थर्मलमध्ये काही अधिकारी २० वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करत आहेत. त्या थर्मलमध्ये आजही जे अवैध राखेचे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात आले पाहिजेत. यामध्ये कोणकोणाची नावे आहेत याची यादी मी पोलिसांना देणार आहे”, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.दिवसा घाबरुन बंद आहे, पण रात्री ही राख उचलली जाते. ही राख बाहेरच्या राज्यातील, जिल्ह्यतील बंद झाली, पण आमच्या जिल्ह्यांअंतर्गत सुरु आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई व्हावी,” अशी मागणीही सुरेश धस यांनी केली आहे.

व्हायरल ऑडिओ क्लीपबद्दल काय म्हणाले धस?
वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याच्या ह्या व्हायरल क्लिपसंदर्भात माझे मत आहे, पुढील १०-१५ दिवस हे चालणार आहे. या दोन महिला अधिकारी आहेत, त्यांना आकाने फोन केलाय. किरकोळ केस सांगितली जात आहे, मी यासंदर्भात अधिक उत्तर देणार नाही, असे धस यांनी माध्यमांना उद्देशून म्हटले. तसेच, त्या अधिकाऱ्याने स्पीकर ऑन कसा केला, सोडू दे असे कसे ते म्हणाले यासंदर्भात तपास करावा. पुढील १५ दिवस हे प्रकरण चालणार आहे, ही क्लिप डीलिट करु नका, असेही सुरेश धस यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...