सुरगाणा | प्रतिनिधी Surgana
खुंटविहिर- दांडीचीबारी रस्त्यावर संततधार पावसामुळे दरड कोसळल्याने तसेच पिंपळसोंड रस्त्यावर उंबरपाडा येथील अंबिका नदीच्या उपनदीच्या फरशी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
दांडीचीबारी येथे दरड कोसळल्याने काही विजेचे पोल कोसळले आहेत. त्यामुळे खुटविहिर, रानविहीर, मोहपाडा, गोणदगड, उदालदरी ,झारणीपाडा,मालगोंदा,तातापाणी उंबरपाडा पिंपळसोंड या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
अंबिकेची उपनदी भूतकुड्याचा ओहोळ व कुंभारचोंड नदीला पूर आल्याने सकाळपासून सात ते आठ तास वाहतूक ठप्प झाली होती. या नदीवर अनेक वर्षापासून पुलाची मागणी आहे.
खुंटविहिर दांडीचीबारी हा अरुंद घाटातील एकेरी रस्ता असून दरवर्षीच पावसाळ्यात या रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प होत असते. घाट कटींग करुन रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. तर दुसरीकडे खुंटविहिर ते पिंपळसोंड रस्त्यावरील नदीवरील अनेक वर्षापासून पुलाची मागणी करुन ती अद्याप पूर्ण झाली नाही. पुरामुळे दरवर्षी च वाहतूक ठप्प होते. या मोरीवरुन बक-या, जनावरे वाहून गेले आहेत.सर्पदंश अथवा गंभीर रुग्ण असल्यास पुराचे पाणी ओसरल्या तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात जाता येत नाही. परिणामी जीव गमवावा लागतो. वाहन धारक जीव मुठीत धरुन वाहने पुराच्या पाण्याचा वाहने टाकतात. विद्यमान आमदारांनी लक्ष घालून समस्या दूर करावी.
शिवराम चौधरी. ,माजी सैनिक पिंपळसोंड





