Saturday, May 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"माझी चूक मला मान्य आहे, मी माफी मागतो, मला माफ करा…"; राज...

“माझी चूक मला मान्य आहे, मी माफी मागतो, मला माफ करा…”; राज ठाकरेंना आव्हान देणारे केडिया नरमले

मुंबई | Mumbai
“राज ठाकरे, तुम्ही लक्षात घ्या की मुंबईत ३० वर्षे राहूनही मला मराठी नीट येत नाही, आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करतात, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही” असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंना आव्हान देणारा उद्योजक सुशील केडिया आता नरमला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज ठाकरे यांची माफी मागितली आहे.

‘माझी चूक मला मान्य आहे. त्याबाबत मी खेद व्यक्त करत आहे. मी माफी मागतो. मला माफ करा, माझे वक्तव्य मागे घेतो. लवकरच मी मराठी भाषा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकेल. हे बिघडलेले वातावरण नीट करा. माझी चूक मला समजली आहे. ती सुधारू इच्छितोय. माझे ट्वीट तणाव आणि दडपणाखाली झाले’, असे सुशील केडिया म्हणाले.

- Advertisement -

काही लोकांना वाद निर्माण करून त्यातून फायदाच मिळवायचा आहे. मराठी न कळणाऱ्या लोकांवर झालेल्या हिंसाचारामुळे मी मानसिक तणावाखाली होतो, आणि त्यामुळे मी अति प्रतिक्रिया दिली. आता मला जाणवतंय की ती प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी होती.

पुढे बोलताना सुशील केडिया म्हणाला, तणावाखाली आणि मानसिकता ठीक नसताना मी ट्विट केले. आता वादातून लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांकडून त्याचा गैरअर्थ काढला जातोय..मराठी न येणाऱ्यांविरोधातला हिंसाचार पाहून मानसिक दबावाखाली येऊन मी ओव्हररिअॅक्ट केले. माझे ओव्हर रिअॅक्शन मागे घ्यायला हवे, याची मला जाणीव झाली. 30 वर्षांपेक्षा जास्त वर्षं मुंबईत राहूनही मला स्थानिक मराठी लोकांसारखे अस्खलित मराठी बोलता येत नाही हे सत्य आहे. सातपेक्षा जास्त भारतीय भाषा मी शिकल्यात. सततच्या भीतीदायक वातावरणात एखादा शब्द इकडचा तिकडे होण्याची शक्यता असते त्यावरून काही लोक टार्गेट करण्याची भीती असते. राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेतलेल्या ठाम भूमिकेचे मी स्वागत करतो. मी राज ठाकरेंचा प्रशंसक आहे. ओव्हररिअॅक्ट करताना माझ्याकडून चूक झाली. मराठी शिकण्यासाठी भीतीऐवजी प्रोत्साहन द्या. माझी चूक स्वीकारतो आणि माफी मागतो.

मी राज ठाकरे यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि कृतज्ञता बाळगली असल्याचे त्याने सांगितले. विशेषत: हनुमान चालीसा मोहीम, हिंदुत्व आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यांवर त्यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले.त्यांनी आपली चूक मान्य केली आणि राज ठाकरे यांच्याकडे दयेची अपेक्षा व्यक्त केली. माझे ट्विट हतबलतेतून आणि तणावातून आले होते, परंतु त्यांनी नेहमीच राज ठाकरे यांच्याबद्दल सकारात्मक विचार व्यक्त केले आहेत. भविष्यातील त्यांनी आशा व्यक्त केली की, मराठी भाषेचा वापर करण्यास भीती नसावी, ज्यामुळे भाषेची प्रावीण्यता वाढेल, असेही ते म्हणाले.

केडियांचे कार्यालय फोडले
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशील केडियाचे ऑफिस फोडण्यात आले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी केडियांच्या कार्यालयावर नारळ आणि दगडफेक करत वरळीतील कार्यालयाची तोडफोड केली आहे. सुरक्षारक्षकांनी मनसे कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तोडफोड केल्यानंतर कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण आहे. महत्त्वाचे म्हणजे वरळीतच राज आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा पार पडत असून येथे कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांनी तुफान गर्दी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

बहुमताचा

TVK Vijay: मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; बहुमताचा आकडा पार,...

0
तामिळ नाडू | Tamil Naduदेशाचं लक्ष लागलेल्या तामिळनाडूतील सत्तास्थापनेत आता अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. टीव्हीके पक्षाला व्हीसीके पक्षाने...