Tuesday, December 3, 2024
Homeजळगावतात्यांचा वारसा मागतात अन् निर्मल सीड्स बंद करण्याचे षड्यंत्रही करतात-सुषमा अंधारे

तात्यांचा वारसा मागतात अन् निर्मल सीड्स बंद करण्याचे षड्यंत्रही करतात-सुषमा अंधारे

पाचोरा । प्रतिनिधी pachora

आ.किशोर पाटील हे एकीकडे तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांचा वारसा मागतात अन् दुसरीकडे त्यांच्या कर्तबगारीचे प्रतिक असलेल्या निर्मल समूहाला बंद करण्याचे कारस्थान रचून हजारोंच्या पोटावर लाथ मारण्याचे काम करत असल्याची टिका करत शिवसेना-उबाठा पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी पाचोर्‍याचे मैदान गाजविले. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रचारासाठी आयोजीत करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

- Advertisement -

पाचोरा विधानसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासाठी आयोजीत केलेली सभा ही सुषमा अंधारे यांनी अक्षरश: जोरदार गाजविली. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांनी विकासाचे व्हिजन मांडतांनाच आमदार तसेच अन्य उमेदवारांवर कडाडून टिका केली. यात प्रारंभी त्यांनी ‘अप्पांचा विषय हार्ड आहे, अन् त्यांच्याकडे 50 खोक्यांचे कार्ड आहे’! अशा शब्दांमध्ये आ.किशोरआप्पांना टोला मारला.

सुषमा ताई अंधारे म्हणाल्या की, स्वर्गवासी आर.ओ.तात्या यांनी अतिशय परिश्रमपूर्वक निर्मल समूहाला प्रगतीपथावर नेले. आज जगभरात या ग्रुपची ख्याती असून येथे परिसरातील हजारो स्त्री-पुरूषांना रोजगार मिळाला आहे. मात्र किशोर पाटील यांनी डी गँग म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या उर्जा खात्याच्या माध्यमातून निर्मल सीडस कंपनी बंद करण्याचे षडयंत्र रचले. यात कंपनीला उर्जा खात्याने साडे सहा कोटी रूपयांची नोटीस दिली. कृषी क्षेत्रातील कंपनी असतांना देखील कमर्शिअल रेट लाऊन ही कंपनी आणि पर्यायाने हजारो कुटुंबांचा रोजगार हिसकावण्याचे षडयंत्र किशोर पाटलांची रचले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ज्याच्यावर गद्दारीचा ठप्पा तो किशोर आप्पा. त्याने मारू नये विकासाच्या गप्पा! अशा शब्दांमध्ये त्यांनी आमदारांची खिल्ली उडविली. पाचोर्‍यातील कोट्यावधी रूपयांचे भुखंड हे नगरविकास खात्याच्या माध्यमातून खासगी विकासकांना विकून टाकल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार हे तात्यासाहेबांचा वारसा सांगत असल्याने त्यांनी लाडक्या बहिणीसाठी यंदा निवडणुकीतून माघार घ्यायला हवी होती असे सुषमा ताई म्हणाल्या.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, सहसंपर्क प्रमुख सुनील पाटील, उध्दव मराठे, रमेश बाफना, अरूण पाटील, अभय पाटील, शरद पाटील, अनिल सावंत, एकलव्य संघटनेचे सुधाकर वाघ, डॉ.संजीव पाटील, भैयासाहेब ईस्माइल फकीरा, गजू पाटील, तिलोत्तमा मौर्य, पुष्पा परदेशी, योजना पाटील, लक्ष्मी पाटील, कमलाताई पाटील, डॉ. अस्मिता पाटील आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या