Friday, March 28, 2025
Homeक्राईमपत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीची कुऱ्हाडीने वार करत हत्या

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीची कुऱ्हाडीने वार करत हत्या

जळगाव – jalgaon

कुऱ्हाडीने सपासप वार करुन पतीने पत्नीची हत्या (Murder) केली. या घटनेत त्यांचा दहा वर्षांचा मुलगाही यात जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरलेला आहे.

- Advertisement -

पत्नीच्या चारित्र्यावर संशयाचे भुत संचारले अन्‌ होत्याचे नव्हते झाले. हाता कुऱ्हाड घेत सपासप वार करत बायकोला संपवलं, या घटनेत चिमुकल्या लेकरावरही वार झाला, यात बालक जखमी झाला.

जळगाव येथील रहिवासी सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे हा आपली पत्नी शीतल उर्फ आरती हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेऊन मारहाण करत असे.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे ही घटना घडली. सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे हा आपली पत्नी शीतल उर्फ आरती हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेऊन मारहाण करत असे. त्याने आपली पत्नी शीतल उर्फ आरती हिच्यावर कुऱ्हाडीने वार केले, यात तिचा मृत्यू झाला. यावेळी त्याने आपला दहा वर्षाचा मुलगा सिद्धू सोमनाथ सोनवणे याच्यावरही वार केले असून तो देखील गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी मयत शीतल उर्फ आरती सोमनाथ सोनवणे हिचा भाऊ भाऊसाहब भावलाल पवार (रा. हनुमंतखेडा, ता.धरणगाव) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

प्रशांत कोरटकरला न्यायालयाचा झटका; दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

0
कोल्हापूर | Kolhapurकोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला...