Friday, May 3, 2024
Homeनाशिकस्वातंत्र्यवीर‎ सावरकर यांच्या सन्मानार्थ नाशकात गौरव‎ यात्रा

स्वातंत्र्यवीर‎ सावरकर यांच्या सन्मानार्थ नाशकात गौरव‎ यात्रा

नवीन नाशिक | प्रतिनिधी

सावरकरांचे खरे‎ जीवनचित्र समाजापुढे यावे यादृष्टीने‎ भाजप (BJP) नवीन नाशिक मंडलाच्या वतीने स्वातंत्र्यवीर‎ सावरकर यांच्या सन्मानार्थ गौरव‎ यात्रेचे (Gaurav Yatra) आयोजन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी गौरव यात्रेचा शुभारंभ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आयटीआय पुल येथे करण्यात आला. एका रथावर लहान मुलांतर्फे स्वातंत्रवीर सावरकर यांची वेशभूषा साकारण्यात आली होती. आदिवासी नृत्य, लेझीम व ढोल ताशांच्या गजरात या गौरव यात्रेला सुरवात करण्यात आली.

आयटीआय पुल मार्गे, नवजीवन विद्यालय मार्गाने त्रिमूर्ती चौक,दिव्या कार्णीवल सिनेमा, सावता नगर, रायगड चौक येथून पवननगर स्टेडियम (Stadium) येथे समारोप करण्यात आला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यावेळी आमदार सिमा हिरे, लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, महेश हिरे, दिनकर पाटील, जगन पाटील, अविनाश पाटील, माजी नगरसेवक राकेश दोंदे, प्रतिभा पवार, भाग्यश्री ढोमसे, रश्मी हिरे बेंडाळे, डॉ. हर्षा फिरोदिया, प्रशांत जाधव, सुनील केदार, डॉ. वैभव महाले, माधुरी बोलकर, इंदूबाई नागरे, ऍड.अजिंक्य गीते, शैलेश साळुंखे, ऍड. अतुल सानप आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील ‘या’ स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घोषित; मे महिन्यात मतदान

- Advertisment -

ताज्या बातम्या