Tuesday, December 3, 2024
Homeक्राईमतलवारी विक्रीसाठी घेऊन आलेल्या युवकाला पकडले

तलवारी विक्रीसाठी घेऊन आलेल्या युवकाला पकडले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

धारदार तलवारी विक्रीसाठी घेऊन येणार्‍या युवकाला भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले. स्वप्निल विठ्ठल वारे (वय 19 रा. भगवान बाबा मंदिराजवळ, सारसनगर) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. नगर- सोलापूर रस्त्यावरील मुठ्ठी चौकाजवळ एक युवक धारदार तलवारी विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना मिळाली होती.

- Advertisement -

त्यांनी तात्काळ तपास पथकातील अंमलदारांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने मुठ्ठी चौकात सापळा लावून सोलापूर रस्त्याने येणार्‍या संशयित युवकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडील प्लास्टिकच्या गोणीत दोन धारदार तलवारी मिळून आल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या