Friday, May 3, 2024
Homeक्रीडाT20 World Cup 2021 : आज रंगणार दोन हायप्रेशर सामने

T20 World Cup 2021 : आज रंगणार दोन हायप्रेशर सामने

दुबई | Dubai

आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत (ICC T20 World Cup 2021) आज गुरुवारी दोन हायप्रेशर मुकाबले रंगणार आहेत. पहिला सामना ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध बांगलादेश (Bangladesh) संघामध्ये दुपारी ३:३० वाजता दुबई (Dubai) येथे होणार आहे…

- Advertisement -

ऑस्ट्रेलिया (AUS) संघासाठी आजच्या सामन्यात विजय अनिवार्य असणार आहे. ३ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासंघाच्या खात्यात २ विजय आणि १ पराभवासह ४ गुण आहेत. आजच्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेतील तिसरा विजय संपादन करण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज आहे.

दक्षिण आफ्रिकेने (South Africa) बांगलादेश (BAN) संघाला पराभूत करून स्पर्धेतील आपला तिसरा विजय संपादन केल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि विंडीज संघाची चिंता वाढली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाची धावगती इंग्लंडविरुद्ध झालेल्या दारुण पराभवामुळे अधिक खराब आहे.

ती सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाला आजच्या सामन्यात बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. तर सुरूवातीचे ४ सामने गमावल्यामुळे बांगलादेश संघ ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून यंदाच्या वर्ल्डकपमधील आपला पहिला विजय नोंदवण्यासाठी सज्ज आहे.

श्रीलंका, विंडीज आज दुसरी लढत

अबू धाबी | Abu Dhabi

आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत आज गुरुवारी दुसरा सामना डिफेंडिंग चॅम्पिअन्स विंडीज (West Indies) आणि श्रीलंका (Sri Lanka) या संघांमध्ये सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे…

श्रीलंका संघाने सुपर १२ लढतीत सलामी सामन्यात बांगलादेश संघाला पराभूत करून विजयी सुरुवात केली होती. मात्र पुढील तिन्ही सामन्यात सलग तीन सामन्यात पराभव झाल्यामुळे श्रीलंका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.

विंडीज संघाने बांगलादेश संघाला पराभूत करून बाद फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम असल्याचे दाखवून दिले आहे. दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून खेळतील यात काही शंका नाही. आजच्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेतील आपला दुसरा विजय मिळवण्यासाठी विंडीज सज्ज आहे. तर वर्ल्डकप स्पर्धेत विजयी निरोप घेण्यासाठी श्रीलंका सज्ज आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या