Monday, October 26, 2026
HomeनगरShrirampur : टाकळीभान येथे जबरी चोरी

Shrirampur : टाकळीभान येथे जबरी चोरी

आठ तोळे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील प्रभाग 2 मधील खळवाडी परिसरात रहात असलेले सेवानिवृत्त पोष्टमन भाऊसाहेब सुखदेव वाडेकर यांच्या घरात रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून टेबलमध्ये ठेवलेले आठ तोळे सोन्याचे दागिने असा आठ ते दहा लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना काल रात्री घडली.

- Advertisement -

या विषयी माहिती अशी की, खळवाडी परिसरात भाऊसाहेब वाडेकर व त्यांचे कुटुंबासह रहात असून शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मुख्य दरवाजाची आतील कडी काढून घरात प्रवेश केला व वाडेकर कुटूंंब झोपलेल्या ठिकाणी त्यांच्या उशाजवळ असलेला टेबल चोरट्यांनी घराबाहेर आणून त्या टेबलामध्ये ठेवलेले आठ तोळे सोन्याचे दागिणे चोरले. टेबलची उचकपाचक झाल्यावर चोरट्यांनी घरातील कपाटाची आणि स्वंपाक घरातील डब्यांचीही उचक पाचक केली. मात्र चोरट्यांना काहीही सापडले नाही. त्यानंतर चोरटे पसार झाले.

वाडेकर कुटूंब सकाळी उठल्यावर त्यांना टेबल बाहेर दिसून आला व कपाटाची उचक पाचक झाल्याचे आढळून आल्यावर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर घरात चोरी झाल्याची माहिती श्रीरामपूर पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. माहिती मिळताच श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे हवादार श्री.बर्डे यांनी घटनास्थळी जावून पहाणी करुन पंचनामा केला. जबरी चोरी असल्याने अहिल्यानगर येथील श्वान पथक फिंगर प्रिंट तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकातील सीमा या श्वानाने घरापासून घुमनदेव येथील वीटभट्टी पर्यंत माग काढला. श्वान पथकामध्ये सहायक पोलीस उपनिरिक्षक श्री.डाके, हेडकॉन्स्टेबल श्री.घोंगडे, फिंगर प्रिंडमध्ये पोलीस उप निरीक्षक सुधीर कराळे, हेडकॉन्स्टेबल रविंद्र गायकवाड, संपत घोडके उपस्थित होते.

अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री.वराडे व प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक कल्पना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दुष्काळाची भणक सुरु झाल्याने ठिकठिकाणी चोरीच्या घटना वाढताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवून ग्रामस्थांना सुरक्षित वाटेल यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पिके गेली आहेत. पाणी पातळी घटल्याने रब्बी हंगामही हातचा जाणार आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र त्यामुळे चोरट्यांची चलती सुरु झाली आहे. चोर्‍यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आपल्या गावाचे रक्षण करण्यासाठी केवळ पोलीस प्रशासनावर आवलंबून न रहाता गावातील तरुणांनी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करुन 10 तरुणांच्या तुकड्या तयार करुन आळीपाळीने रात्रीची गस्त सुरु करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या गावाच्या सुरक्षेसाठी सर्व तरुणांनी स्वेच्छेने सहभाग घेवून येणार्‍या दिवसात गावाची सुरक्षा केली तर रात्रीच्या चोर्‍यांना आळा बसेल.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आठवडाभर प्रचाराची रणधुमाळी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या जनरलच्या सहा जागा आणि सोसायटी मतदारसंघातील चार अशा दहा जागांसाठी येत्या 2 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील...