नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ड्रोनच्या (Drone) माध्यमातून शहरातील आपत्कालीन परिस्थितीवर (Emergencies) नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्टसिटीद्वारे (smart city) विशेष प्रशिक्षणाचे (training) आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात शहरात उभारण्यात आलेल्या दोन कॅमेर्यांच्या (camera) कार्यक्षमता दाखवर्यात आल्या. त्यांच्या अभ्यासाचे प्रशिक्षणही देण्यात आले. यामध्ये महानगरपालिकेच्या अग्निशामक दलातील (fire brigade) कर्मचारी व पोलिसांचा (police) समावेश होता.
स्मार्ट सिटी मिशन (Smart City Mission) अंतर्गत केंद्र शासनाच्या (Central Govt) मार्गदर्शक तत्त्वानुसार नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (Nashik Municipal Smart City Development Corporation Limited) द्वारे इम्प्लिमेंटेशन अँड मेन्टेनन्स ऑफ इंटिग्रेटेड सर्व्हेलन्स अँड सिटी ऑपरेशन्स प्लॅटफॉर्म (आयएससीओपी) तसेच इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (Emergency Operations Center) (इओसी) या प्रकल्पांंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये ड्रोनच्या (Drone) माध्यमातून शहरावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. या उपक्रमामध्ये देण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थीना ड्रोन कशा पद्धतीने वापरायचा त्यासाठी कोणते सॉफ्टवेअर (software) वापरले पाहिजे, ड्रोन वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे याची संपूर्ण माहिती देण्यात आली. त्याचबरोबर सर्व प्रशिक्षणार्थीची परीक्षा घेऊन त्यांना ड्रोन वापरण्याचा परवाना प्रदान करण्यात आला.
यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Nashik Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar), पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde), नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंंत मोरे (Sumant More, Chief Executive Officer, Nashik Smart City) तसेच आयटी विभागाचे महाव्यवस्थापक अनिल तडकोड (Anil Tadkod, General Manager, IT Department), उपमहाव्यवस्थापक सुधीर गोराडे आणि ड्रोन कॅमेर्यांचे प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
स्मार्ट सिटीच्या वतीने दोन ड्रोन कॅमेरे महानगरपालिकेला तर दोन ड्रोन कॅमेरे पोलीस विभागाला देण्यात येणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून पूर परिस्थितीचे निरीक्षण, आगामी काळात कुंभमेळ्याचे क्राउड मॉनिटरिंग, विविध ठिकाणांचे अचूक मॅपिंग तसेच आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. यासोबतच या प्रकल्पांतर्गत नाशिक शहरात 200 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका व तसेच सहा विभागीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यात येणार आहे.