Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारमिरची, पपई, केळीच्या निर्यातीसाठी शासन स्तरावरून उपाययोजना करा!

मिरची, पपई, केळीच्या निर्यातीसाठी शासन स्तरावरून उपाययोजना करा!

नंदुरबार | प्रतिनिधी – NANDURBAR

जिल्ह्यात मिरची, पपई व केळी (Chili, papaya and banana) या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. त्यांची निर्यात करण्यासाठी शासनस्तरावरून उपाययोजना करण्यात यावी तसेच गुजरातच्या (gujrat) धर्तीवर ९० ठिबक सिंचन योजनेत 90 टक्के अनुदान राबविण्यात यावी अशी मागणी बोरद ता. तळोदा (taloda) येथील शेतकरी (farmer) मिलिंद पाटील यांनी मुख्यमत्र्यांकडे (Chief Minister) आयोजित भेटीदरम्यान केली.

- Advertisement -

Visual Story श्रध्दा कपूरचा ट्रॅडिशनल लुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. २५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज्यातील काही शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त स्नेहभोजन व हितगुज करण्यासाठी आमंत्रित होते. नंदुरबार जिल्ह्यातून बोरद ता.तळोदा येथील शेतकरी मिलिंद लक्ष्मीकांत पाटील व त्यांच्या पत्नी सौ. राजश्री मिलिंद पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. पाटील दांपत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे कुलदैवत आई देवमोगरा मातेची प्रतिमा भेट दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना पाटील यांनी सांगितले, नंदुरबार जिल्ह्यात मिरची, पपई व केळी या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. त्यामुळे त्यांच्या निर्यातीसाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासोबतच शेतीचा माल सुरक्षित रहावा यासाठी शासकीय शीतगृह उभारण्याची गरज आहे. याशिवाय शासनाच्या विविध योजनाचा लाभ शेतकऱ्यांना योग्यरीत्या मिळणे गरजेचे आहे.

गुजरात राज्याच्या धर्तीवर 90 टक्के अनुदानाने ठिबक सिंचन योजना राबविण्यात यावी. आदिवासी बांधव हे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भगर, मोह आदी उत्पादन घेत आहेत.ते पौष्टिक असून त्याचे नवीन वाण प्रसारित करून एखादा मध्यम प्रकल्प राबवण्यात यावा आदी मागण्या पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी हितगुज करताना केल्या. यावेळी कृषी आयुक्त धीरजकुमार उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी यांनी संपर्क अधिकारी म्हणून कामकाज केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या