Friday, May 3, 2024
Homeनगरकरोना रोखण्यासाठी आ. कानडे यांनी घेतली गावकारभार्‍यांची बैठक

करोना रोखण्यासाठी आ. कानडे यांनी घेतली गावकारभार्‍यांची बैठक

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आ. लहू कानडे यांनी करोनाची रुग्णसंख्या वाढताच श्रीरामपूर व राहुरी मतदारसंघातील सर्व तालुकास्तरीय

- Advertisement -

प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन आढावा घेतला आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

करोना वाढीसाठी काळजी घेण्याचा संदेश प्रत्येक गावात पोहचावा म्हणून मतदारसंघातील 6 जिल्हा परिषद गटांमध्ये सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, बी.डी.ओ. यांच्याही बैठका घेतल्या.

टाकळीभान व उंदिरगाव गटातील बैठका संपन्न झाल्या या बैठकांना सहायक गटविकास अधिकारी दिघे, विस्तार अधिकारी आर. डी. अभंग, कृषी अधिकारी कडलग व 13 गावांतील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. तसेच जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इंद्रभान पाटील थोरात, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, राजेंद्र कोकणे, अ‍ॅड. सर्जेराव कापसे, अनिल कोकणे, प्रा.कार्लस साठे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्व मुरकुटे, जिल्हा परिषद सदस्य अशोक पवार, पंचायत समिती सदस्या वंदनाताई मुरकुटे, विष्णूपंत खंडागळे आदी उपस्थित होते.

उक्कलगाव व पढेगाव येथे दत्तनगर व बेलापूर गटाच्या बैठका झाल्या यावेळी इंद्रभान पाटील थोरात, विलास थोरात, राजूभाऊ थोरात, विकास थोरात, कविता भोसले, सरपंच किशोर बनकर, अच्युतराव बडाख, बाबा शेटे, गीताराम खरात, अतुल खरात उपस्थित होते.

टाकळीमियाँ व देवळाली प्रवरा येथे बैठका झाल्या. यावेळी सरपंच वेणूनाथ निकम, उपसरपंच ज्योतीताई शिंदे, सुरेश निमसे, सुधाकर शिंदे, अमृत धुमाळ, बाळासाहेब सगळगिळे, सचिन धुमाळ, सतीश धुमाळ, सादीक शेख, राजू बर्डे, बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.

या सर्व बैठकांमध्ये आ. कानडे यांनी मतदारसंघातील नुकत्याच निवडणुका झालेल्या 42 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचाचे शाल, श्रीफळ देऊन अभिनंदन केले. तसेच निवडणुका संपल्यानंतर लोकप्रतिनिधी कोणा एका पक्षाचा किंवा गटाचा नसतो तर तो संपूर्ण गावाचा असतो, त्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व नागरिकांना न्याय दिला पाहिजे. आपला लोकप्रतिनीधी म्हणून मनामध्ये कोणताही किंतु न बाळगता सर्वांनी खुल्या दिलाने गावाच्या विकासासाठी आमदारांशी संपर्क ठेवावा. सर्वांना तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून जे जे शक्य असेल त्या प्रकारची मदत माझ्याकडे येणारांना मी जरूर करीन, असेही आ. कानडे यांनी सांगितले.

तुर्तास आपल्या सर्वांच्यासमोर करोनाच्या वाढत्या संसर्गाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. मा. मुख्यमंत्र्यांनी याबाबत चिंता व्यक्त करून सर्वांना मास्क वापरा आणि करोना टाळा, असे आवाहन केले आहे. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष इंद्रभान पाटील थोरात व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या