Sunday, May 5, 2024
Homeनंदुरबारगणपती विसर्जन मिरवणुका नियोजनपूर्वक काढा : आमदार राजेश पाडवी

गणपती विसर्जन मिरवणुका नियोजनपूर्वक काढा : आमदार राजेश पाडवी

मोदलपाडा Modalpada ता.तळोदा वार्ताहर

तळोदा (Taloda) शहरातील गणपती विसर्जन मिरवणुका नियोजनपूर्वक (Ganapati Immersion Procession) काढा ,गणेशोत्सव शांततेचा (silence) राजा म्हणून साजरा झाला पाहिजे ,गणेश मंडळांनी (Ganesh Mandals) ठरवलेल्या रूट नुसारच (According to the determined route) विसर्जन मिरवणुका (Immersion processions) पार पाडाव्यात व शांततेत सण साजरे करण्याचे आवाहन आमदार राजेश पाडवी (MLA Rajesh Padvi) यांनी तळोदा येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत (Peace Committee Meeting) केले.

- Advertisement -

गौरी विसर्जनाच्या दिवशी झालेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सोमवारी रात्री नाचण्यावरून तरुणांचा दोन गटात वाद झाला होता. त्या वादाच्या पार्श्वभूमीवर लागलीच शांतता समितीची बैठक तळोदा तहसील कार्यालयात घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी उपस्थित होते.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत ,तहसीलदार गिरीश वखारे ,नगराध्यक्ष अजय परदेशी ,पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे उपस्थित होते.

आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की रात्री घडलेला प्रकार निंदनीय असून सर्वांनीच त्याकडे गांभीर्याने घ्यावे. गणेश मंडळांचे पदाधिकारी व संयोजक नियोजन करण्यात कमी पडले त्यामुळे अशा घटना घडत असतात. जे दोषी असतील त्यांना निश्चितच शिक्षा झाली पाहिजे मात्र खात्री केल्याशिवाय पोलीस प्रशासनाने कोणाचीही नावे घेऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पुढील मिरवणुका नियोजनबद्ध काढण्याच्या सूचना त्यांनी गणेश मंडळांना दिल्या.

नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी देखील घडलेला प्रकार निंदनीय असून तळोदा शहर शांततामय मार्गाने गणेशोत्सव साजरा करणारे शहर असल्याने शहराला गालबोट लागेल असे कृत्य कोणीही करू नये असे आवाहन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत ,पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांनी यापुढे होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गणेश मंडळांना सूचना केल्या.

यावेळी अनुप उदासी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद वाणी ,श्रीराम मगरे ,अनिल माळी ,अविनाश टवाळे ,हेमचंद्र टवाळे , उमेश ठाकरे ,बापू पाटील ,विनोद वंजारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचण्याचा कारणावरून आपसात वाद निर्माण करून एकमेकांवर दगडफेक करत एकास धारदार हत्याराने दुखापत केली. त्यामुळे ११ जणांवर तळोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील सोनार गल्ली मातोश्री ज्वेलर्स समोर नाचण्याच्या वादातून ही घटना घडली आहे.या कारणावरून पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंद केला आहे. याबाबतीत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या