Friday, May 3, 2024
Homeनगरतळेगाव प्रादेशिक योजना : 'रोटेशन' नंतरच पाणी पुरवठा सुरळीत होणार

तळेगाव प्रादेशिक योजना : ‘रोटेशन’ नंतरच पाणी पुरवठा सुरळीत होणार

तळेगाव दिघे | वार्ताहर

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे भागातील २१ गावांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणाऱ्या तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या वडगावपान शिवारात असलेल्या साठवण तलावातील पाणीसाठा संपला आहे.

- Advertisement -

भंडारदरा धरण अथवा निळवंडे धरणाचे रोटेशन सुरु झाल्यावर योजनेच्या तलावात पाणीसाठा करण्यात येईल. रोटेशन नंतर लाभार्थी गावांचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती योजनेच्या जीवनधारा समितीचे सचिव सुरेश मंडलिक यांनी दिली.

तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात सध्या केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे योजनेंतर्गतच्या २१ लाभार्थी गावांमध्ये सध्या निर्जळी सुरु आहे. योजनेद्वारे केला जाणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना पाणी टंचाई सोसावी लागत आहे.

भंडारदरा धरण अथवा निळवंडे धरणाचे रोटेशन सुरु झाल्यावर योजनेच्या तलावात पाणीसाठा करण्यात येईल. त्यानंतर लवकरच लाभार्थी गावांचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, असेही योजनेच्या जीवनधारा समितीचे सचिव सुरेश मंडलिक यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या