Friday, May 3, 2024
Homeदेश विदेश‘तांडव’ वादाच्या भोवर्‍यात, हिंदू विरोधी असल्याचा आरोप

‘तांडव’ वादाच्या भोवर्‍यात, हिंदू विरोधी असल्याचा आरोप

मुंबई –

हिंदू देवतांवर आधारित वादग्रस्त दृश्यांमुळे पॉलिटिकल ड्रामावर आधारित ‘तांडव’ या वेब सीरिजवरुन नवा वाद निर्माण

- Advertisement -

झाला आहे. सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा, सूनील ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका असलेली निर्माता अली अब्बास जफर याची ‘तांडव’ ही वेब सीरिज 15 जानेवारीला प्रदर्शित झाली असून वादात सापडल्याचं पहायला मिळतंय. या वेब सीरिजमधील शंकर आणि राम या हिंदू देवतांवर आधारित एक दृश्य आहे. त्यावरुन सोशल मीडियात वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. भाजप नेत्यांनीही या वेब सीरिजवर आक्षेप घेतला आहे.

भाजप नेता कपिल मिश्रा यांनी या वेब सीरिजला विरोध करताना एक ट्वीट केलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की, तांडव वेब सीरिज ही दलित विरोधी आहे. ती हिंदूंच्या भावनाही भडकवणारी आहे. या विरोधात माहिती आणि प्रसारण मंत्री जावडेकरांना लोकांनी लिहावं. हे सांगताना कपिल मिश्रा यांनी मंत्रालयाचा ईमेल आयडीही दिला आहे.

भाजप नेते राम कदम म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत तांडव या वेब सीरिजवर बहिष्कार टाकण्यात येईल. त्या सीरिजचे अभिनेते दिग्दर्शकांवर एफआयआर दाखल झाला पाहिजे. त्यांनी हिंदू देवीदेवतांचा अवमान करण्याचं कृत्य केलं आहे. त्यांनी हात जोडून, गुडघे टेकून समस्त देशाची आणि हिंदू समजाची माफी मागायला हवी. भविष्यात चित्रपट विश्वातील लोकांकडून अशा प्रकारे हिंदू देवी-देवतांचा अवमान झाल्यास त्यांना भरचौकात जोड्यानं फटकावू, असा इशारा राम कदम यांनी दिला.

राम कदम यांनी तांडव या वेब सीरिजमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तांडव या वेब सीरिजमध्ये असलेल्या दृश्यांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. अली अब्बास तांडव वेब सीरिजचा दिग्दर्शक असून डाव्या विचारसरणीच्या अजेड्याला प्रोत्साहन दिलं जात आहे. झीशाननं या ठिकाणी भगवान शिव यांचा अवमान केला आहे. दरम्यान, मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांविरोधात कारवाई करण्यात यावी आणि त्वरित गुन्हा नोंदवला जावा, असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

का सतत चित्रपटांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये हिंदू देवी-देवतांचा अवमान करण्याचं काम केलं जातं. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे तांडव ही वेब सीरिज. सैफ अली खान पुन्हा एकदा अशा सीरिजचा भाग आहे ज्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफरला त्या सीरिजमधून भगवान शंकराची मजा उडवणारा भाग काढून टाकावा लागणार आहे. अभिनेता झीशान आयुबलाही माफी मागावी लागणार आहे. जोवर आवश्यक ते बदल केले जाणार नाहीत, तोवर याचा बहिष्कार केला जाईल, असं राम कदम म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याविषयी संताप व्यक्त केला आहे.

कोणत्या दृष्यांना विरोध होतोय?

तांडव वेब सीरिजच्या पहिल्या एपिसोडमध्ये एका विद्यापीठाच्या नाटकामध्ये भगवान शंकराच्या भूमिकेत असलेल्या जीशान अयूबला नारदाच्या भूमिकेतील व्यक्ती म्हणते की, भगवान, काहीतरी करा. सोशल मीडियावर भगवान रामाच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत आहे. मला वाटतंय की, आपण काहीतरी वेगळी रणनीती तयार करायला हवी. त्यावर जीशान अयूब म्हणतो, मग काय करु, बदलू का? त्यावर नारद पुन्हा म्हणतो, भगवान तुम्ही खूपच भोळे आहात.

या दृष्याला अनेक प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच आणखी एका दृष्यालाही प्रेक्षकांनी विरोध दर्शवला असून त्या दृष्याच्या माध्यमातून दलित विरोधी विचार दाखवल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. या प्रकरणावर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर कमेन्ट करण्यात येत असून या सीरिजच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे. ट्विटरवर #BanTandavNow हा हॅशटॅगही ट्रेन्ड होतोय.

काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या वेब सीरिज विरोधात मत व्यक्त करताना त्यातून डाव्या विचारसरणीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचाही आरोप केला आहे. तसेच अनेकांनी हा हिंदू विरोधी प्रचार असल्याचं मतही व्यक्त केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या