संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहर पोलीस ठाणे हद्दीतील रायतेवाडी शिवारात मळीचा टँकर मागे घेत असताना एकजण गंभीर दुखापत होवून ठार झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी दुपारी घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. 18) गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की सुभाष पांडुरंग बोर्डे (रा. रांजणगाव बु. ता.राहाता) हा मळीचा टँकर (क्र. एमएच. 43, ई. 8640) रायतेवाडी येथील शेतकरी दिलीप शिवदास शिंदे यांच्या शेतात मागे घेत असताना रवींद्र आबासाहेब कालेकर (वय 37, रा. रांजणगाव बु., ता. राहाता) यास धडक बसून गंभीर दुखापत होवून ठार झाला.
याप्रकरणी अक्षय मारुती फोपसे (रा. गोंडेगाव, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकर चालक सुभाष बोर्डे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदशानाखाली पोलीस उपनिरीक्षक पटेल करत आहेत.