Thursday, May 2, 2024
Homeनगरसहकारी चळवळ महाराष्ट्राची आत्मा- ना. विखे

सहकारी चळवळ महाराष्ट्राची आत्मा- ना. विखे

राहाता |वार्ताहर| Rahata

काळाच्या ओघात आपण सहकार चळवळ बदलू शकलो नाही. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. सहकारी चळवळ महाराष्ट्राचा आत्मा आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

- Advertisement -

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतर्फे राहाता येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सहकार परिषद व बँक शताब्दी महोत्सव नुकताच पार झाला. यावेळी ना. विखे पाटील म्हणाले, सहकारी चळवळीने महाराष्ट्राला समृद्ध केले. काळाच्या ओघात व्यावसायिक संस्था, पगारदार नोकरांच्या संस्थांच्या पलीकडे ही चळवळ जायला तयार नाही. सहकारी साखर कारखान्यांपेक्षा खासगी कारखान्यांची संख्या आज वाढली आहे.

अलीकडे मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक निघाल्यामुळे राज्याचा हस्तक्षेप थांबला आहे. राज्यकर्त्यांनी सहकारी चळवळ ही सरकारी चळवळ केली. या चळवळीचा राजकीय फायद्यासाठी वापर केला. त्यामुळे या चळवळीला घरघर लागली. या सहकार परिषदेच्या निमित्ताने सर्व प्रश्नांची चर्चा झाली. नवा आशय सहकार चळवळीमध्ये निर्माण झाला. केंद्रामध्ये सहकार मंत्रालय स्थापन झालेले आहे. त्यामुळे सहकाराची मक्तेदारी माझ्याकडे आहे असे समजणार्‍यांना चाप बसला आहे.

हर्षवर्धन पाटील, प्रा. गणेश शिंदे, सातारा बँकेचे माजी अध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके, बळवंत पाटील, विनायक शिंदे, आप्पासाहेब कुल, गणेशचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, संजय कळमकर, राजकुमार साळवे, दत्ता कुलट, विठ्ठल फुंदे, विद्युलता आढाव, अंजली मुळे, बाळासाहेब कदम, राजेंद्र ठोकळ, दिनेश खोसे, शरद वांडेकर, राजेंद्र निमसे, गोकुळ कळमकर, मनोज सोनवणे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बँकेचे माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन,संचालक तसेच माजी सर्व कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुरुमाऊली महिला आघाडीने महिला दिनानिमित्त घेतलेल्या काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. प्रास्ताविक बँकेचे चेअरमन संदीप मोटे यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र पोटे व श्रीमती पिंगळे यांनी केले तर आभार सलीमखान पठाण यांनी मानले.

याप्रसंगी शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाट, किसन खेमनार, राजू राहणे, बाबा खरात, संतोष अकोलकर, राजेंद्र सदगीर, रमेश साबळे, अनिल भवार, गंगाराम गोडे, बाळासाहेब मुखेकर, सुयोग पवार, द. मा. ठुबे, अ. फ. शेख, गुलाबराव ढोले, महारणवर, शि. का. वाकचौरे, ग. का. साळी, द. र. ताम्हाणे, ल. बा. कोल्हे, सु. पा. वांढेकर, लतिका घुले यांच्यासह शिवाजी नायकवाडी, वि. च. बनकर, काटे, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या