Friday, May 3, 2024
Homeनगरशेवगाव-गेवराई मार्गावर अपघात; शिक्षकाचा मृत्यू

शेवगाव-गेवराई मार्गावर अपघात; शिक्षकाचा मृत्यू

बोधेगाव l वार्ताहर l Bodhegaon

शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर मोटारसायकल व ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचा सुकळी येथे झालेल्या अपघातात माध्यमिक शिक्षक अश्रीनाथ जरे जबर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने शेवगावला हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच निधन झाले.

- Advertisement -

शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील सुकळी येथे रस्त्याने मोटारसायकलवर जाणार्‍या अश्रीनाथ जरे व ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचा जबर अपघात होवून गोळेगाव येथील भगवान विद्यालयातील शिक्षक जरे हे बोधेगावकडे घरी येत असताना झालेल्या विचित्र अपघातात जबर जखमी झाले. ही घटना गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. अपघातानंतर बराच वेळ ते जखमी अवस्थेत पडले होते. त्यांना पुढील उपचारासाठी शेवगावला तातडीने खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना निधन झाले. ऐन दिपावलीच्या धामधुमीत घटना घडल्याने बोधेगाव गोळेगाव भागात शोककळा पसरली. शुक्रवारी रात्री उशिरा शेवगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ज्ञानेश्‍वर, केदारेश्‍वर, गंगामाई आदी विविध साखर कारखान्यांचे गळीत हंगाम जोरात सुरू झाल्याने ऊस वाहतुकीमुळे शेवगाव- गेवराई राज्य मार्ग व इतर रस्त्याने प्रवास करणे अत्यंत धोक्याचे बनले आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून काही ठिकाणी अरुंद रस्ते असल्यामुळे वाहने जात असताना जनतेला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. ऊस वाहतूक करणार्‍या टायर बैलगाडी, ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक आदी वाहनांची मोठी संख्या आहे ही वाहने रात्र दिवस मुख्य रस्त्याने धावत आहेत. शिक्षक जरे यांच्या अपघाताची माहिती होताच संस्थेचे संस्थापक बाळासाहेब फुंदे, सोपान घोरतळे आदींनी शेवगावकडे धाव घेतली.

ऊस वाहतूक करणार्‍या बैलटायर गाडी व ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागच्या बाजूने रिफ्लेक्टर लावले जात नसल्याने रात्री वाहनाचा अंदाज येत नाही. तसेच वाहनांला असंख्य ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर डबल ट्रॉली लावून ऊस वाहतूक करतात व ट्रॅक्टर ड्रायव्हर मोठ मोठ्या आकाराचे साऊंड लावीत ट्रॅक्टर चालवतात. त्यांना मागिल बाजूचा अंदाज येत नाही. त्यामुळे साऊंड सिस्टीम लावून वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर संबंधित साखर कारखान्याचे व पोलीस कारवाई करण्याची मागणी होत आहे. बोधेगाव येथे बन्नोमाँ दर्गा परिसरात शेवगाव गेवराई राज्यमार्गावरच भर रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत व व्यवसाईकांचे अतिक्रमण वाढल्याने रस्ता अरुंद झाल्यामुळे टायर बैलगाडी चालकांना दररोज मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी एकही पोलीस कर्मचार्‍यांची नेमणूक नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या