Thursday, May 2, 2024
Homeनगरटेम्पोची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

टेम्पोची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

तळेगाव दिघे | वार्ताहर

संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील बस स्‍टॅंड समोर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या

- Advertisement -

अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दादाभाऊ नवनाथ पवार ( वय ४० वर्षे रा. निळवंडे ) असे मृताचे नाव आहे. लोणी ते संगमनेर रस्त्यावर वडगावपान येथे शनिवारी ( दि.२०) दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.

निळवंडे येथील दादाभाऊ नवनाथ पवार हे दुचाकीवरून (क्रं. एमएच १७ एन ४९१ ) लोणी ते संगमनेर रस्त्याने वडगावपान बस स्‍टॅंड समोरुन संगमनेरच्या दिशेने प्रवास करीत असताना संगमनेरकडून लोणीकडे जाणाऱ्या टेम्पोने (क्र. एमएच १७ एजी ४३९५) दुचाकीला जोराची धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार दादाभाऊ पवार (वय ४० वर्षे रा. निळवंडे) हे जागीच ठार झाले. याप्रकरणी बाळासाहेब मारुती पवार यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अपघातास व दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला

आरोपी टेम्पो चालक चालक राहुल सुकदेव रुपवते (रा. कासारा दुमाला ता. संगमनेर) याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर अधिक तपास करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या