Sunday, May 5, 2024
Homeजळगावअमळनेरात दगडफेकीमुळे तणाव

अमळनेरात दगडफेकीमुळे तणाव

अमळनेर । Amalner

व्हॉट्सअ‍ॅपवरील स्टेटसला धार्मिक तेढ निर्माण होईल अशी प्रतिक्रिया दिल्याने ख्वाजानगर भागात संतप्त जमावाने दगडफेक केली. मात्र वेळीच पोलीस पोहचल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ख्वाजानगर येथील तौफिक शेख याने त्याचा वर्गमित्र गौरव रामकृष्ण पाटील रा. गणेश कॉलनी तांबेपुरा याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला धार्मिक तेढ निर्माण होईल अशी प्रतिक्रिया दिली. तो संदेश इतर मित्रांनी पाहिला आणि त्याची चर्चा होताच संतप्त जमावाने ख्वाजा नगर भागात दगडफेक सुरू केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती आटोक्यात आणली. रात्री अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी भेट दिली. उशिरापर्यंत शहरात चोख बंदोबस्त होता.

गौरव याने दिलेल्या फिर्यादीवरून कलम 295 अ व 153 अ जातीय ,धार्मिक भावना भडकवल्या बद्दल तौफिख शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.

दरम्यान दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी काही शांतता समिती सदस्यांची बैठक घेऊन शांतता ठेवण्याचे आवाहन केले. दोन जाती धर्मात तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. यावेळी नसीर हाजी, इम्रान खाटीक, जाकीर शेख, आरिफ भाया हजर होते.

सोशल मीडियावर भावना भडकवणारे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणार्‍याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

-रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या