Friday, May 3, 2024
Homeनगरआ. बोरनारेंविरोधात 'पन्नास खोके एकदम ओक्के' घोषणाबाजी; काळे झेंडे दाखवल्याने तणाव

आ. बोरनारेंविरोधात ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ घोषणाबाजी; काळे झेंडे दाखवल्याने तणाव

वैजापूर | प्रतिनिधी | दिपक बरकसे

वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार प्रा. रमेश बोरणारे यांच्यासमोरच ठाकरे गटाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवल्याने महालगावात शुक्रवारी दुपारी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

- Advertisement -

अखेर आमदार प्रा. रमेश बोरणारे यांचे कार्यकर्ते महेश शिवदास बुणगे यांनी वीरगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून राजू गलांडे, योगेश मोहितेसह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महालगावात सध्या शांतता असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक रोडगे यांनी दिली.

महेश बुणगे यांच्या तक्रारीनुसार वैजापूरचे आमदार प्रा. बोरणारे हे एका दुकानाच्या उदघाटनासाठी महालगावात आले होते. त्यांच्यासोबतच्या वाहनात महेश बुणगे व पारस घाटे, ज्ञानेश्वर टेके, अनिल चव्हाण हेही होते. उदघाटनानंतर बोरणारे हे बापूसाहेब झिंजुर्डे यांच्या घरी पोलीस ताफ्यासह जात असताना महालगाव ग्रामपंचायतीजवळ राजू गलांडे, योगेश मोहिते व इतर १० ते १२ जणांनी आमदारांचे वाहन पाहून घोषणाबाजी सुरू केली.

तसेच काळे झेंडे दाखवून चिथावणीखोर घोषणाबाजी सुरू केली. घोषणा देणाऱ्यांना समजावून सांगत असताना पोलीसही वाहनातून उतरले. मात्र, पोलिसांशी हुज्जत घालत, शिविगाळ करून लोटालोटी केली. तसेच आमदार बोरणारे यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महालगाव येथे ग्रामपंचायतची निवडणूक लागलेली असून आचार संहिता लागू आहे. आचार संहिता लागलेली असतांना देखील आमदार व त्यांचे कार्यकर्ते काठ्या, कोयते घेऊन येथे दादागिरी करण्याच्या उद्देशाने आले. आम्ही लोकशाही मार्गाने त्यांचा निषेध नोंदवत असताना त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.

अविनाश गलांडे

महालगाव मध्ये मी खासगी कार्यक्रमा निमित्त गेलेली होतो. परतत असताना काही कार्यकर्ते हे निषेध वर्तवत होते. परंतु त्यातील काही कार्यकर्ते हे हातामध्ये दांडे घेऊन उभे दिसले त्यांनी जे कृत्य केले त्याचा व्हिडिओ मी पोलीस प्रशासनाला दिला आहे.

आमदार रमेश बोरनारे

दरम्यान बोरनारे यांचे कार्यकर्ते महेश बुणगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीरगाव पोलीस ठाण्यात राजू गलांडे व इतर अनोळखी 10-12 व्यक्तींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी कायदा हातात उचलणाऱ्यावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, व आगामी काळात महालगाव मध्ये शांती प्रस्थापित राहावी याकरिता शांतता बैठक देखील घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. या घटनेने शिंदे सेना व ठाकरे सेनेच्या जखमींवर मीठ चोळले आहे,भविष्यात या दोघांमध्ये तीव्र संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही

- Advertisment -

ताज्या बातम्या