Tuesday, July 28, 2026
Homeनाशिककादवा सहकारी साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

कादवा सहकारी साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

ओझे l वार्ताहर Oze

- Advertisement -

सातत्याने ऊस उत्पादकांचे हित जपत, ऊस उत्पादकांना चांगला दर देण्याची परंपरा कादवा ने जोपासली असून कारखान्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करत उसाचे एकरी उत्पादन वाढवावे कादवालाच ऊसपुरवठा करावा, असे आवाहन कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.कादवा सहकारी साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली त्यावेळी ते बोलत होते.सभेच्या प्रारंभी सर्वाधिक ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

शेटे यांनी प्रास्ताविकात २००७ पासूनची कारखान्याची वाटचाल उलगडली. कर्जबाजारी कारखान्याला उर्जितावस्थेत आणत गाळप क्षमता दुप्पट करण्यात आली, इथेनॉल प्रकल्प सुरू झाला व सध्या कारखान्यावर कोणतेही कर्ज थकीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील काळात सीबीजी, सीएनजी व पोटॅश, हायड्रोजन, सोलर प्रकल्प राबवण्याचा मानस असल्याचे त्यांनी जाहीर केले. शासनाच्या निर्देशांनुसार ३,००० रुपये एफआरपी अदा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गेली चार वर्ष संस्थेला सातत्याने लेखा परीक्षणात ‘अ’ वर्ग मिळाला असल्याचे सांगितले.

विरोधी गटातर्फे सुरेश डोखळे यांनी साखर उत्पादन व नफा घटल्याचे मुद्दे उपस्थित केले, तर सचिन बर्डे यांनी रिकव्हरी आधारित एफआरपी , वाहतूक व उत्पादन खर्च वाढीबाबत प्रश्न विचारले. यावर आक्रमकपणे उत्तरे देत शेटे यांनी सर्व आरोप फेटाळले व “संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का लावू नका” असे आवाहन केले.

सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील, जिल्हा बँक माजी संचालक गणपतराव पाटील, गंगाधर निखाडे, संपत कोंड, तानाजी माळी, संपत कावळे, विश्राम दुगजे, कामगार संचालक भगवान जाधव, विश्वासराव देशमुख, संजय पाचोरकर,विठ्ठल अपसुंदे, शिवानंद संधान, वसंतराव थेटे, जयराम डोखळे, रघुनाथ पाटील ,माणिक उफाडे,शिवाजी पताडे आदींनी चर्चेत भाग घेतला.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर “शासनाने संपूर्ण कर्जमाफी करावी” असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी माजी
आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले, शिवसेना संपर्कप्रमुख सुनील पाटील, बाजार समिती सभापती प्रशांत कड, व्हा. चेअरमन योगेश बर्डे, व्हा. चेअरमन शिवाजीराव बस्ते, सर्व संचालक,बोपेगांव सरपंच वसंत कावळे,जे.डी. केदार
राज्य बँकेचे व्यवस्थापक कोलवडकर, तपासणी अधिकारी नरेंद्र पाटील, हाके आदि सह सभासद, कारखान्याचे अधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत संचालक सुखदेव जाधव यांनी केले तर आभार रावसाहेब पाटील यांनी मानले.

ताज्या बातम्या

Rahata : जायकवाडीचा साठा 58.52 टक्क्यांवर

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचे मध्यम स्वरूपाचे आगमन होत आहे. धरणातील विसर्ग नवीन पाण्याची आवक कमी झाल्याने घटविण्यात आले आहेत. गोदावरीत काल सायंकाळी...