Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या९४ वे मराठी साहित्य संमेलन मार्च महिन्यात

९४ वे मराठी साहित्य संमेलन मार्च महिन्यात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आगामी ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाची संभाव्य तारीखही निश्चित करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस हे संमेलन होणार असून २६, २७ आणि २८ मार्च २०२१ अशी तारीख निश्चित करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ प्रतिनिधी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आज (दि.२४) या संमेलनाच्या अध्यक्षांची घोषणा केली जाणार आहे.

- Advertisement -

शनिवारी नाशिक येथे झालेल्या बैठकीस साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, छत्तीसगढ येथून कपूर वासनिक, मंडळाचे कार्यवाह दिलीप गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, मिलिंद जोशी, दिलीप मानेकर, वर्धा येथून प्रदीप दाते, मुंबई येथून प्राचार्या उषा तांबे, लोकहितवादी मंडळाचे हेमंत टकले, जयप्रकाश जातेगावकर, मुकुंद कुलकर्णी, शंकर बोर्‍हाडे, सुभाष पाटील उपस्थित होते.

दरम्यान, होणार्‍या साहित्य संमेलनाच्या निमित्त येणार्‍या प्रतिनिधींचे शुल्क, ग्रंथालयांचे स्टॉल्सचे शुल्क याबाबत चर्चा करण्यात आली. झालेल्या बैठकीत साहित्य संमेलन हे शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस आयोजित केले जाईल. त्याच्या संभाव्य तारखांवरही चर्चा करण्यात आली. दि. २६, २७ आणि २८ मार्च २०२१ रोजी हे संमेलन हेणार असल्याचे कळते. तसेच शुक्रवारी दि. २६ संमेलनाचे उद्घाटन झाल्यावर निमंत्रित कवींचे कवी संमेलन होईल. २७ मार्चला मुलाखत आणि सत्कार केले जातील. यानंतर परिसंवाद आणि कथाकथन आयोजित केले जाईल. तसेच दुसर्‍या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तर २८ मार्च रोजी संवाद, लक्षवेधी कवींचे संमेलन, परिसंवाद करुन समारोप केला जाणार आहे.

आज निवड

या संमेलनासाठी साहित्यिक भारत सासणे यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चिले जात आहे. त्यावर आज दुपारी शिक्कामोर्तब केले जाण्याची दाट शक्यता आहे. तर, स्वागताध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे. जयंत नारळीकर, भारत सासणे आणि जनार्दन वाघमारे यांच्यापैकी एक नाव अध्यक्षपदासाठी निश्चित हाेऊ शकते. संमेलनस्थळ जाहीर होताच भारत सासणे यांचे अध्यक्षपदासाठीचे नाव अग्रक्रमाने चर्चेत आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या