Wednesday, December 4, 2024
Homeजळगाव108 रुग्णवाहिकेला लागलेल्या आगीची प्रशासनाने घेतली दखल

108 रुग्णवाहिकेला लागलेल्या आगीची प्रशासनाने घेतली दखल

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

जळगाव – jalgaon
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर खोटे नगर जवळ 13 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा 108 या रुग्णवाहिकेला (Ambulance) आग लागली. रुग्णवाहिकेतील रुग्णाना खाजगी वाहनाने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तात्काळ याची माहिती घेवून पोलिस विभागाला घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

ही रुग्णवाहिका फोर्स या कंपनीकडून बनविलेली आहे. फोर्स मोटरचे टीम पण जळगाव साठी रवाना झालेली आणि ते पण या तपासामध्ये परिवहन आणि पोलीस विभागाला मदत करणार आहे. त्याच्याशिवाय 108 रुग्णवाहिका व्यवस्थापनालाही बोलवून घेण्यात आले आहे. ते पण या ठिकाणी येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

या रुग्णवाहिके ऐवजी इतर जिल्ह्यातून दुसरी रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून देण्याची सूचना आरोग्य विभागाला करण्यात आली आहे. ज्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिकेचे प्रमाण पुरेसे राहील आणि जळगाव जिल्ह्यात रुग्णवाहिकेची कमतरता भासणार नाही.

घटनास्थळावर अप्पर पोलीस अधीक्षक, जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी भेट दिली असून संपूर्ण घटनेवर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, लक्ष ठेऊन असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या