Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्याविधानसभेचे कामकाज पुन्हा तहकूब; नेमकं काय घडलं आज सभागृहात?

विधानसभेचे कामकाज पुन्हा तहकूब; नेमकं काय घडलं आज सभागृहात?

मुंबई | Mumbai

आज विधिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याचं भाषण होणार होतं. त्याआधी सभागुहात विरोधकांनी वीज कनेक्शनचा (Electricity Connection) मुद्दा उपस्थित केला. विरोधकांनी वीज कनेक्शन तोडण्यावरून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला…

- Advertisement -

त्यामुळे विधानसभेचे (Assembly) कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधकांनी विधानसभेत गोंधळ केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल झाले नाही. तसेच विधानपरिषदेतदेखील ते उपस्थित राहणार नसल्याचे समजते.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या अभिभाषण चर्चा गोंधळात पुरवणी चर्चा आणि मतदान आज घेण्यात आले. त्यानंतर नगरविकास, महसूल, उद्योगसंबंधी प्रश्नांवर चर्चा झाली. ओबीसी आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. नंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या