Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रघातपात की आत्महत्या? बेपत्ता झालेल्या पणन सहसंचालकांचा मृतदेह नीरा नदी सापडला

घातपात की आत्महत्या? बेपत्ता झालेल्या पणन सहसंचालकांचा मृतदेह नीरा नदी सापडला

पुणे | Pune

राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरु होता मात्र, शोध सुरु असताना शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीपात्रात सापडला आहे.

- Advertisement -

पणन विभागात कार्यरत सहसंचालक शशिकांत घोरपडे बुधवारी (१२ ऑक्टोबर) बेपत्ता झाले होते. घोरपडे दुपारी ३ वाजेच्या सुमारास पुणे येथील कार्यालयातून मोबाईल बंद करून बाहेर पडले. त्यानंतर त्यांचा ठिकाणा कळू शकला नाही. त्यांच्या कुटुंबियांनी घोरपडे बेपत्ता झाल्याची तक्रार शिरवळ पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला होता.

शशिकांत घोरपडे यांच्या कुटुंबियांनी तक्रार दिल्यानंतर गुरुवारपासून पोलिसांनी तपास सुरू केला. तपास करत असताना पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज आले. सातारा-पुणे महामार्गावर असलेल्या शिंदेवाडी या महामार्गालगत असलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये शशिकांत घोरपडे शेवटचे कैद झाले. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये शशिकांत घोरपडे हे नीरा नदीवरील पुलाकडे जाताना दिसत आहे. तसेच त्यांची गाडी पुलाजवळ आढळून आली.

नीरा नदी पात्रात त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. त्याच्या आधारे कालपासून NDRF आणि स्थानिक रेस्क्यू टीम यांच्याकडून त्यांचा शोध नीरा नदी पात्रात घेण्यातं येत होता. अखेर दुसऱ्या दिवशी ५ तास शोधकार्य केल्यानंतर, त्यांचा मृतदेह शोधण्यात NDRF च्या जवानांना यश आल आहे.त्यांनी आत्महत्या का केली याच कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या