Saturday, April 26, 2025
Homeक्राईमNashik News : माजी आयपीएस सासऱ्याला सुनेची धमकी; मागितली वीस लाखांची खंडणी

Nashik News : माजी आयपीएस सासऱ्याला सुनेची धमकी; मागितली वीस लाखांची खंडणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या (Ex-IPS officer) सूनेने प्रियकराच्या मदतीने त्याला व पत्नी, मुलाला धमकावून आलिशान कार, फ्लॅट्ससह दहा कोटींची खंडणी (Extortion)मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. तसेच दोन्ही संशयितांनी दागिन्यांचा अपहारही केला असून याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरुन अंबड पोलिसांनी (Ambad Police) माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या सूनेसह प्रियकराविरुद्ध खंडणीसह इतर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Loksabha 2024 : हेमंत गोडसेंनी घेतली मंत्री भुजबळांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय पोलिस (Police) सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी तथा नाशिकचे माजी पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील (वय ६५) (Sahebrao Patil) यांनी अंबड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांची सून संशयित स्नेहा रोशन पाटील व तिचा प्रियकर अजिंक्य पाटील (रा. नेरुळ, नवी मुंबई) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद आहे.

हे देखील वाचा : Nashik News : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी काढली थेट तडीपारीची नोटीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा हिने फिर्यादींसह कुटुंबियांचे मानसिक खच्चीकरण करुन प्रतिमा मलीन केली. वारंवार फिर्यादी, त्यांची पत्नी व मुलाला धमकावून नातू सम्राट याला भेटायचे असल्यास नवी मुंबईत फ्लॅट, आलिशान कार व दहा कोटी देण्याची मागणी केली. यासह फिर्यादी यांच्या दागिन्यांचाही अपहार केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, हा सर्व प्रकार सन २०१६ ते ७ मे २०२४ पर्यंत घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्याचे (Ambad Police Station) उपनिरीक्षक किरण शेवाळे पुढील तपास करीत आहेत. तर संशयितांचा शोध सुरु असून त्यांना चौकशीनंतर अटक (Arrested) होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंना सत्तेचा मोह, बाळासाहेबांना त्यांची क्षमता..; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : पाकला एक थेंबही पाणी देणार नाही –...

0
नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने (India) पाकिस्तानसोबत (Pakistan) असलेला सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. या करारासंदर्भात शुक्रवारी (दि.२५)...