Wednesday, June 17, 2026
Homeनाशिकपाथर्डी शिवारातील फ्लॅटमध्ये आढळला विवाहितेचा मृतदेह

पाथर्डी शिवारातील फ्लॅटमध्ये आढळला विवाहितेचा मृतदेह

नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

पाथर्डी शिवारातील सदाशिवनगर येथील कृष्णा प्राइड अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये गुरूवारी (दि. २९) दुपारी विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला. निशा मयूर नागरे (वय- ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महिलेचा पती बेपत्ता असून महिलेचा मोबाइल व कागदपत्रे घरात आढळून आली नाहीत.

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अंकोलीकर, उपनिरीक्षक संतोष फुंदे आदींनी पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शासकीय जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शवविच्छेदन शुक्रवारी (दि.३०) सकाळी फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत केले जाणार आहे. यानंतर या महिलेच्या मृत्यूमागील नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून सभासद संस्थांच्या (सेवा सोसायट्यांच्या) प्रतिनिधींचे ठराव 17...